मोठी बातमी! वाल्मिक कराडची तब्बेत बिघडली, आयसीयूत दाखल; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! वाल्मिक कराडची तब्बेत बिघडली, आयसीयूत दाखल; नेमकं काय घडलं?

Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. या प्रकरणात काही आरोपी तुरुंगात आहेत. वाल्मिक कराडवरही मकोका (Walmik Karad) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचीही सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आता कराडबाबत एक महत्वाची अपडेट मिळाली आहे. वाल्मिक कराडला काल रात्री सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. येथे आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडच्या पोटात दुखू लागल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाल्मिक कराडला जामीन मिळणंही अवघड, किमान ६ महिने मुक्काम तुरुंगातच असणार?

याबाबत अधिक माहिती अशी, तब्बेत बिघडल्यानंतर काल रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्याला कारागृहातून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येथील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. वाल्मिक कराडला श्वसनासंबंधीचाही आजार आहे. याबाबत त्याने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सोबत कागदपत्रेही जोडली होती.

३१ डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने पुणे सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. सुरुवातीला त्याला खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र नंतर संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणी त्याच्यावर मकोका दाखल करण्यात आला. आता या प्रकरणी न्यायालयाने कराड न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी जेव्हा सीआयडीला तपासासाठी कराडची गरज असेल तेव्हा ते कराडची चौकशी करू शकतात. यासाठी सीआयडीला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. गरज पडल्यास सीआयडी कराडच्या पोलीस कोठडीची विनंती करू शकते.

सहा महिने तुरुंगातच मुक्काम

दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली तरी वाल्मिक कराडला पुढचे काही महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत. कारण वाल्मिक कराडवर मकोका गुन्ह्याची नोंद झाली आहे. मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही. त्यामुळे कराड पुढील 180 दिवस म्हणजेच ६ महिने तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही अशी माहिती समोर येत आहे.

Income Tax : वाल्मिक कराड किती रुपयांचा कर भरायचा?; धक्कादायक आकडेवारी आली समोर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube