सुनेत्रा पवार अन् परिवाराशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्रिपदावर सुनील तटकरे स्पष्टच बोलले

Sunil Tatkare On Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे

  • Written By: Published:
Sunil Tatkare On Sunetra Pawar

Sunil Tatkare On Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटलो पण त्यांच्याशी उपमुख्यमंत्रिपदवर चर्चा झाली नाही. पक्षाचा निर्णय हा सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करुन घेतला जाणार असं माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री पदासाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?

माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे पण त्यांच्याशी इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. सुनेत्रा पवार आणि त्यांचा परिवार हा धार्मिक विधीमध्ये आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्या परिवाराशी चर्चा करु तसेच आमचे आमदार आणि जनतेच्या मनात काय आहे हे ठरवू असं माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले.

पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, दादांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून कुणीही सावरलं नाही. अजूनही दादा आमच्यातच असल्याचं वाटतंय. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यलयात येण हेसुद्दा क्लेषकार आहे. याच कार्यालयात राष्ट्रवादीचं संघटन उभं केलं त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मी आलो असेही यावेळी सुनील तटकरे म्हणाले.

कल्याण- डोंबिवलीत पुन्हा ट्विस्ट, मनसेचा होणार महापौर? एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय

तर दुसरीकडे सध्या राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची मागणी केली जात आहे. उद्या आमच्या पक्षाची बैठक आहे. त्यामध्ये विधीमंडळ प्रमुखांची निवड केली जाणाार असून जर उद्याच्या बैठकीत निर्णय झाला तर उद्याच शपथविधी होईल असं माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले.

follow us