Income Tax : वाल्मिक कराड किती रुपयांचा कर भरायचा?; धक्कादायक आकडेवारी आली समोर
Walmik Karad Property Income Tax : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याच्या आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात अनेक ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपुर्वी घरगडी असलेला कराड इतकी मालमत्ता जमवतो कशी? (Walmik Karad) ऊसतोडीसाठी जिथले मजूर पोटावर संसार बांधत देशभरात जातात त्याच परळीत वाल्मिक कराड इतकी माया जमवतो कशी? असा सवाल आता संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. आता तो किती कर भरायचा याची आकडेवारी समोर आली आहे.
Video : मी हवेत आरोप केले नव्हते; कराड गँगचं फुटेज समोर येताच धसांनी आकांवर तोफ डागली
वाल्मिक कराड हा अधिकृतपणे आयकर विभागाकडे वार्षिक किती लाख रुपयांचा कर भरायाचा, याची माहिती समोर आलेली आहे. साधारण आपल्याकडे 10 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के अशी करची प्रणाली आहे. तसंच, तुमच्याकडे जर अधिकचा पैसा असेल तर सरचार्ज लागतो. अमेरिकेत सरचार्ज जसा श्रीमंतांना द्यावा लागतो. तसं भारतात देखील वेगवेगळ्या पद्धतीचे सरचार्जेस आहेत आणि जो अधिकचा आहे, त्याला 34 ते 35 टक्के कर भरावा लागतो.
ऊसतोड कामगाराचा मुलगा वाल्मिक कराडची आतापर्यंत अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक कराडची परदेशात देखील संपत्ती असल्याचा संशय सीआयडीला आहे. याबाबत तपास देखील सुरु आहे. आता वाल्मिक कराड आयकर विभागाकडे वार्षिक जवळपास 96 लाख रुपये कर भरत होता, अशी माहिती समोर आलेली आहे.
सर्वात मोठा पुरावा समोर
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराडसोबत दिसत आहे.