Video : मी हवेत आरोप केले नव्हते; ‘कराड गँगचं’ फुटेज समोर येताच धसांनी ‘आकां’वर तोफ डागली
Mla Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर सध्या एसआयटीमार्फत त्याची चौकशी सुरु आहे. तर इतर 8 आरोपींचीही पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस (Mla Suresh Dhas) यांनी केला होता. त्यानंतर या घटनेतील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. कराड गॅंगचे फुटेज व्हायरल होताच आमदार धस यांनी या घटनेतील आका उर्फ वाल्मिक कराडांवर तोफ डागलीयं.
आमदार धस पुढे बोलताना म्हणाले, मी जे आरोप केलेले होते, त्याचे पुरावे एसआयटीने पुढे आणलेले आहेत. मी हवेत आरोप केलेले नाहीत. लोकांकडून खंडणी, खून प्रकरणामध्ये आका वाल्मिक कराडचा संबंध आहे, हे आता स्पष्ट आहे. आवादा कंपनीच्या शिंदेंना 29 नोव्हेंबरला इथेनॉलच्या गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं. त्यांना पाथर्डीतून मारत मारत आणलं होतं, त्यानंतर सोडलं असल्याचा सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा आमदार धस यांनी केला आहे.
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का?, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?
या हत्येच्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच मी आका वाल्मिक कराड याच्यासह सुदर्शन घुले, विष्णू चाटेंसह इतर आरोपींवर आरोप करीत आहे. मी हवेत आरोप केलेले नव्हते आज एसआटीच्या तपासात तेच समोर येत आहे. आता या प्रकरणात आका वाल्मिक कराडसह इतर आरोपी खरे आहेत, हे स्पष्ट होणार असल्याचं आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय.
पालकमंत्रिपदावरून गोगावले नाराज, DCM शिंदेंनी घेतली बाजू, ‘अपेक्षा ठेवण्यात गैर काय?’
या प्रकरणात पीआर पाटील यांना आरोपी केलं पाहिजे, तर महाजन यांना निलंबित केलं पाहिजे. तर गर्जे यांना चुकीचं ट्विट केलं आहे. त्यांना पुण्याला नाही तर गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे, त्यांचेही अनेक प्रताप असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. राजेश पाटील यांनाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेण्यास काही हरकत नाही, मी याआधी देखील मागणी केली होती, मी तो मी नव्हेच म्हणणारा , तो खरंच आरोपी असल्याचंही धस यांनी म्हटलंय.