पालकमंत्रिपदावरून गोगावले नाराज, DCM शिंदेंनी घेतली बाजू, ‘अपेक्षा ठेवण्यात गैर काय?’
Eknath Shinde : रायगडचं (Raigad) पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पालकमंत्रिबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे, अशा शब्दांत गोगावलेंनी नाराजी बोलून दाखवली. यानंतर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) गोगावलेंच्या नाराजीवर भाष्य केलं.
BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट, तब्बल दीड तास चर्चा; निवडणुकीची रणनीती ठरली?
भरत गोगावलेंनी अनेक वर्षे रायगडसाठी काम केलं आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवण्यात वावगं काय आहे? नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत लवकरच मार्ग निघेल, असं शिंदे म्हणाले.
LIVE📡| 20-01-2025 📍 दरेगाव 🎥 पत्रकारांशी संवाद
https://t.co/9aEZ5GpTLY— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 20, 2025
एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी आले. यावेळी त्यांनी माध्यमांशीस संवाद साधला.
शिंदे हे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा सुरू असून ते नाराजीमुळं सातारा येथील त्यांच्या दरेगावी आल्याचं बोलल्या जातं. यावर भाष्यच करतांना शिंदे म्हणाले की, कोण काय बोलतं, याकडे मी लक्ष देत नाही. मी येथे कामात आहे. महाबळेश्वरला मोठा प्रोजेक्ट आहे. याच्या मागे लागलो आहे. गावी आलो म्हणजे नाराज झालो, असं काहीजण म्हणतात. मात्र, मी इथल्या विकासकामांसाठी गावत आलो आहे. या जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आणि पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मी दरेगावी आलो, असं ते म्हणाले.
यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना विचारले की महायुतीत सर्व काही आलबेल आहे का? यावर शिंदे म्हणाले, तुम्हाला असा का पडतो? महायुती भक्कम आहे. निवडणुकीपासून तुम्हाला असे प्रश्न सतत पडत आले आहेत. तिकीट वाटपापासून ते आतापर्यंत सगळे प्रश्न सुटत गेले. मंत्रिमंडळाचा आणि आता पालकमंत्रिपदाचा प्रश्न देखील जवळजवळ सुटला आहे, असं ते म्हणाले.
BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट, तब्बल दीड तास चर्चा; निवडणुकीची रणनीती ठरली?
भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या पालकमंत्रिपदाच्या नाराजीबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले, पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण यात वावगं असं काहीच नाही. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रायगडमध्ये काम केलं आहे. त्यामुळं अशी अपेक्षा ठेवून मागणी करण्यात काही गैर नाही. मी महायुतीत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत. आपण तिघे बसून यावर चर्चा करून तोडगा काढू. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत लवकरच मार्ग निघेल. तुम्ही (प्रसारमाध्यमांनी) काहीही काळजी करू नका, असं शिंदे म्हणाले.