भरत गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री, तर 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद; मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक वाचा एका क्लिकवर

भरत गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री, तर 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद; मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक वाचा एका क्लिकवर

Bharat Gogavale 8th Pass : राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून 5 डिसेंबरला महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. अखेर काल फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये कोणते मंत्री किती शिकलेले (Cabinet Ministers Education) आहेत? हे आपण जाणून घेऊ या.

…त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळ ऐकू येईल, झाकीर हुसैन यांना राज ठाकरेंची आदरांजली

राज्याच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार काल नागपूरमध्ये पार पडला. यावेळी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळातील तब्बल 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद असल्याची माहिती दिव्य मराठीच्या हवाल्यानुसार मिळत (Maharashtra Politics) आहेत. दोनजण दहावी पास असून नऊ मंत्री केवळ बारावीपर्यंत शिकलेले आहेत. चार जणांनी पदविका पूर्ण केलीय तर पाच मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. 18 मंत्री पदवीधर आहेत. या यादीतील फक्त भरत गोगावले हे सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत. गोगावले आठवी पास आहेत.

नितेश राणेंनी शपथ घेताच उद्धव ठाकरेंवर वार; वाचा, पोस्टमध्ये काय म्हणाले निलेश राणे

गोगावले यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांना अखेरच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळांचं अध्यक्षपद दिलं होतं. महायुती सरकारच्या नव्या मत्रिमंडळाचा शपथविधी अखेर काल नागपूरमध्ये पार पडलाय. नव्या मंत्रिमंडळात सात वकील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जणांनी वकिलीची पदवी घेतलेली आहे. पंकज भोयर हे डॉक्टरेट मिळवलेले एकमेव मंत्री आहेत.

या मंत्रिमंडळात अजित पवार गटातील अदिती तटकरे (वय 36) सर्वात तरूण मंत्री, तर गणेश नाईक ( वय 74) हे सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. तर तब्बल 16 मंत्री साठीपार आहेत. तटकरे यांची दुसऱ्यांदी मंत्री म्हणून निवड झालेली आहेत. शपथ घेतलेल्या 39 मंत्र्यांपैकी 23 मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर 38 तर मेघना बोर्डिकर यांच्यावर 13 आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्यावर 9 गुन्ह्यांची नोंद आहे. तर सोळा मंत्र्यांवर मात्र कोणताही गुन्हा नोंद नाही.

या यादीतील सर्वात श्रीमंत मंत्री भाजपचे मंगलप्रभात लोढा आहेत, तर सर्वात गरीब मंत्री दादा भुसे आहेत. मंगलप्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 447 कोटी 9 लाख 23 हजार रुपये आहे. त्यानंतर यादीत दुसरा क्रमांक शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा लागतो. त्यांची एकूण संपत्ती 333 कोटी 32 लाख 95 हजार रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आहेत. त्यांची संपत्ती 128 कोटी 41 लाख 81 हजार रुपये आहे, तर शिवसेनेचे दादा भुसे यांची संपत्ती 1 कोटी 60 लाख 85 हजार रुपये आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube