Cabinet Expansion : 39 आमदारांना लाल दिवा, तर भुजबळ, केसरकर, आत्राम अन् मुनगंटीवारांना डच्चू…

  • Written By: Published:
Cabinet Expansion : 39 आमदारांना लाल दिवा, तर भुजबळ, केसरकर, आत्राम अन् मुनगंटीवारांना डच्चू…

Cabinet Expansion : राज्यातील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रविवारी पार पडला. नागपुरात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली गेली. तर अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात अजितदादांचे 9 शिलेदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

सर्वप्रथम भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींनाही संधी देण्यात आली. दरम्यान, फडणवीस सरकारमध्ये मोठी खांदेपालट झाली. भाजपने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांचा पत्ता कट केलाय. तर शिवसेनेच्या शिंदे गटातून तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील धर्मरावबाबा आत्राम, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे या पाच मंत्र्यांना मंत्रीपदे मिळाली नाहीत.

भुजबळ-वळसे पाटलांना मंत्रिपद का नाही? चाकणकरांनी सांगितलं खरं कारण..

रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष होणार…
शिंदे सरकारच्या काळात मंत्री राहिलेले रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यांना भाजप नवी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार आहे.

केसरकर अन् सावंतांचा पत्ता का कट झाला?
तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपचा विरोध होता. हे तिन्ही मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादग्रस्त राहिलेत. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाचा चेहरा स्वच्छ असावा, असा भाजपचा आग्रह होता. मात्र, तानाजी सावंत हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेत. त्यांच्या विधानांमुळे महायुतीची अनेकदा कोंडी झाली. आरोग्यमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तर दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण खाते होते. पण त्याची कामगिरीही निराशाजनक राहिली. त्यामुळे त्यांना  लाल दिवा  मिळू शकला नाही.

भुजबळांचा अन् वळसे पाटलांनाही डच्चू…
नव्या आमदाराला संधी देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीपुढे आला होता. दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा आत्राम आणि छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला. वळसे पाटील यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय भरणेंना मंत्रिपद देण्यात आलं. दुसरं असं की, भुजबळांनी अनेकदा मराठा समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळं त्यांना डच्चू मिळाला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube