BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट, तब्बल दीड तास चर्चा; निवडणुकीची रणनीती ठरली?

  • Written By: Published:
BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट, तब्बल दीड तास चर्चा; निवडणुकीची रणनीती ठरली?

Uddhav Thackeray Meets Sharad Pawar: शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत ठाकरे-  पवारांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशिल समजू शकलेला नाही. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली.

“स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमयेची प्रमुख भूमिका; हसनभाईचे खास पात्र साकारले 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, आमदार रोहित पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत बीड प्रकरणासह अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं बोलल्या जातं.

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना आपली ताकद आजमावून पाहणार असल्याचं बोलल्या जातं. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं. तर शरद पवार गटाकडूनही मुंबई महानगरपालिकेच्या ५० टक्के जागा स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळं महाविकास आघाडीत फूट पडल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत एकमत घडजवण्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे.

VIDEO : राज्यात येत्या 23 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार…शिंदे गटाच्या नेत्याचा दावा 

तसेच, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी २५ जानेवारी रोजी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जनआक्रोश मोर्चात महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असेल? याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली.

मुंबई स्वबळावरच?
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणूक स्वबळावर लढेल आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी करेल, अशी पक्षातील नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता कमी असल्याचं देखील बोललं जातं आहे.

मुंबईचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे
मुंबई महानगरपालिकेत महायुतीने विजय मिळवावा यासासाठी भाजप रणनीती आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने मुंबईचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिले आहे, मुंबई शहरात शिंदे गटापेक्षा भाजपचे आमदार जास्त आहेत. तरीही भाजपने शिंदेंना पालकमंत्रीपद दिले. तर मुंबई उपनगराच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्यासह आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube