‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया
Suresh Dhas On Valmik Karad MCOCA : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आज वाल्मिक कराडावर (Valmik Karad) पोलिसांनी मकोका (MCOCA) गुन्हा दाखल केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. या मागणीनंतर आज वाल्मिक कराडावर मकोका दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात सुरुवातीपासून आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश धस (Sresh Dhas) यांनी देखील वाल्मिक कराडावर पोलिसांनी मकोका गुन्हा दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणीही सहभागी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आणि एसआयटीने जे काही काम केलं आहे त्यानुसार न्यायालयाने आदेश दिले आहे. तसेच त्यांना कोणत्या गुन्हाच्या आधारे मकोका लावला हे मला माहिती नाही. असं सुरेश धस म्हणाले.
पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील. या प्रकरणात पोलिस यंत्रणा आहे. जी एसआयटी नेमलेली आहे ते त्यांच काम करत आहे आणि पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते त्यामध्ये येतील. कायद्या पुढे कोणीही मोठं नाही. असं देखील सुरेश धस म्हणाले.
मी मुन्नाभाई MBBS, माझा मुन्नीशी कॉन्टॅक्ट नाही, सुरेश धसांनी स्पष्टच सागितलं
तर दुसरीकडे वाल्मिक कराडावर पोलिसांनी मकोका गुन्हा दाखल करताच परळीमध्ये वल्मिक कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. बाजारपेठात शुकशुकाट बघायला मिळत आहे. तर बीडमध्ये प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत.