राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण? उत्तर मिळालं, सुरेश धसांनीच केला मोठा खुलासा

राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण? उत्तर मिळालं, सुरेश धसांनीच केला मोठा खुलासा

Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटले. आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभर आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस रोज नवीन खुलासे करत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील बडी मुन्नी असा शब्द प्रयोग केला होता. तेव्हापासून ही मुन्नी कोण असा प्रश्न विचारला जात आहे. आता पुन्हा सुरेश धस यांनीच याबाबत मोठा दावा केला आहे. मुन्नी कोण हे मुन्नीला कळलं आहे आणि मुन्नी म्हणजे पुरुष आहे, असे धस म्हणाले आहेत.

मनोज जरांगे, आमदार सुरेश धस अन् संदीप क्षीरसागरांवर गुन्हा दाखल, ओबीसींचं ठिय्या आंदोलन

धस पुढे म्हणाले, मी ज्या मु्न्नीचा उल्लेख केलाय, जी मुन्नी आहे तिला ते कळालेलं आहे. पण ती महिला भगिनी नाही बरं का, नाही तर आणखी काही राळ उठायची. मी मुन्नी असा जो उल्लेख केला होता. ती राष्ट्रवादीतील पुरुष मुन्नी आहे. सुरेश धस माझ्याबद्दलच बोलत आहेत हे त्या मुन्नीलाही चांगलच ठाऊक आहे. कच्चेबच्चे लोक येतात माझ्याविरोधात बोलतात त्यांना पाठवू नका. मुन्नीनेच स्वतःहून पुढे यावं अशी विनंती मी केली होती. मुन्नी आल्याशिवाय बोलायलाही मजा येणार नाही असे सुरेश धस म्हणाले.

अजितदादाही भडकले

सुरेश धस यांचं नाव घेत प्रश्न विचारताच अजितदादा भडकले होते. बडी मुन्नी कोण ते त्यांना (सुरेश धस) विचारा. असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. इथून पुढे मी नाव घेऊन बोलेन, असं देखील अजित पवार म्हणालेत. त्यानंतर पालकमंत्री पदावर बोलताना अजित पवार म्हणाले की, पालकमंत्री कुणाला करायचं? हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. माझा पक्ष, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचा निर्णय ते घेतील. त्यांच्या खासदारांशी कोणीही संपर्क साधलेला नाही. साखर कारखान्यासंबंधी प्रश्नाबाबत अमित शहा यांना भेटल्याचे अजित पवार म्हणाले होते.

बीडमध्ये धनंजय बोले..पोलीस दल हाले.. विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube