मनोज जरांगे, आमदार सुरेश धस अन् संदीप क्षीरसागरांवर गुन्हा दाखल, ओबीसींचं ठिय्या आंदोलन

मनोज जरांगे, आमदार सुरेश धस अन् संदीप क्षीरसागरांवर गुन्हा दाखल, ओबीसींचं ठिय्या आंदोलन

Case file on Jarange Dhas and Kshirsagar : मनोज जरांगे पाटील व आमदार सुरेश धस (Dhas) यांनी वंजारा समाज व धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या चिथावणीखोर वक्तव्य केलं असं म्हणत गेवराई येथील पोलीस ठाण्यात ओबीसींनी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेताच मनोज जरांगे-पाटील व आमदार सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडमुळेच पंकजा मु्डेंचा लोकसभेला पराभव, सुरेस धसांचा गौप्यस्फोट

मस्साजोग(ता केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या यासाठी शनिवारी(ता ४)परभणी येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही.

परभणी व धाराशिव जिल्ह्यातील आमचे माणसे घरात घुसून मारतील असे असंवैधानिक विधान केल्याबद्दल तसेच आमदार सुरेश धस यांनी देखील चिथावणीखोर वक्तव्य केल्याने सोमवारी गेवराई पोलीस ठाण्यासमोर धनंजय मुंडे समर्थक तसेच ओबीसींनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असून यावेळी आंदोलकांनी पवित्रा घेताच पोलिस प्रशासनाने अखेर मनोज जरांगे-पाटील व आमदार सुरेश धस यांच्या विरोधात संतोष आधंळे यांच्या माहीतीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube