गेवराईत २०१९ ची पुनरावृत्ती?, अजित पवारांची विजयसिंह पंडितांना उमेदवारी, लक्ष्मण पवार अपक्ष?

  • Written By: Published:
गेवराईत २०१९ ची पुनरावृत्ती?, अजित पवारांची विजयसिंह पंडितांना उमेदवारी, लक्ष्मण पवार अपक्ष?

Gevrai Assembly Election 2024 : गेवराई विधानसभेत आता तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Gevrai) या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने मिळवली आहे. पहिल्या यादीत बदामराव पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपचे विद्यमान आमदार जे नाराज आहेत अशी चर्चा आहे त्यांना डावलून आता इथली जागाच भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडली आहे. त्यामध्ये आता विजयसिंह पंडित आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आजच त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

हे सगळं होत असताना चर्चा होती ती लक्ष्मण पवार यांची. मध्ये पवार हे शरद पवार गटाच्या संपर्कात राहून तुतारी वाजवण्याच्या तयारीत होते असंही बोललं जात होतं. परंतु, आता ठाकरे गटाला जागा मिळाल्याने पवार मध्येच लटकले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महायुतीकडून बदामराव यांचे पुतणे विजयसिंह पंडित हे अपक्ष लढण्याच्या तयारीत असताना त्यांना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे येथे आता काका-पुतण्या अशी लढत होणार आहे. तसंच, पवार अपक्ष लढणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे दुहेरी नाही तर तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; लंकेंच्या पारनेरात काशिनाथ दातेंना तिकीट

महायुतीकडून बुधवारी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये परळीतून धनंजय मुंडे तर माजलगावातून प्रकाश सोळंके यांना पुन्हा उमेदवारी दिली. गेवराईमधून अजित पवार गटाकडून जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित इच्छुक होते. अखेर त्यांना आज उमेदवारी मिळाली आहे. आता लक्ष्मण पवार हे काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे. कारण ते भाजपचे विद्यमान आमदार असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती.

२०१९ ला फटका बसला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह पंडित हेच विजयी होतील असं वाटत होतं. परंतु, या मतदारसंघात लक्ष्मण पवार, विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडित अशी तिरंगी लढत झाली. विजयसिंह यांची मतं बदामराव यांच्याकडे गेल्याने लक्ष्मण पवार यांना फायदा झाला आणि ते दुसऱ्यांदा आमदार झाले. यावेळीही हीच परिस्थिती निर्माण होईल अशी स्थिती आहे. फक्त पवार हे अधिकृत कुठल्याच पक्षाचे उमेदवार नाहीत असं असलं तरी ते अपक्ष म्हणूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यची शक्यात आहे. तसं झालं तर पुन्हा एकदा 2019 सारखीच तिरंगी लढत येथे पाहायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube