विश्वास बसणार नाही असा क्षण, महाराष्ट्राने दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला; नीलम गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली
Neelam Gorhe On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर
Neelam Gorhe On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या की, सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आलेले अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. कोरोना काळात त्यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीचा निधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दृष्टी दर्शवतो. विधानपरिषद उपसभापतीपदाच्या काळात विविध समित्या व सभागृहाच्या कामकाजात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती व विकास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवार हे उत्तम संसदपटू होते आणि विधानपरिषदेत त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना व सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
अपघात कसा घडला?
समोर आलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते मात्र विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने बारामती विमानतळापासून काही अंतरावर अजित पवार यांचा विमान क्रॅश झाला. विमान ज्या भागात कोसळले, तो भाग खोल होता आणि परिसरात झाडं झुडपं आणि उस शेती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यास अडचणी येत होत्या अशी देखील माहिती समोर आली आहे.
विमानात कोण कोण होते ?
1. अजित पवार
2. विदीप जाधव
3. पिंकी माळी
4. कॅप्टन सुमित कपूर
5. कॅप्टन शांभवी पाठक
