अहिर म्हणजे निर्भीड; योग्य वेळी… सचिन अहिर उपसभापती होताच CM फडणवीसांनी पाठ थोपटली
Devendra Fadnavis On Sachin Ahir : विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून आज शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे आमदार सचिन अहिरे
Devendra Fadnavis On Sachin Ahir : विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून आज शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे आमदार सचिन अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सचिन अहिरे यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सचिन अहिर आणि आम्ही विधानसभेत 1999 साली एकत्रच निवडून आलो होतो. त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम करण्याची संधी देखील मिळाली. त्यामुळे त्यांच्याशी जुना परिचय आहे. अहिर ह्या शब्दाचा अर्थ गोपलक आणि निर्भीड होतो. अहिर या शब्दाचा अर्थ बघितला तर जो कोणाला घाबरत नाही, जो निर्भीड आहे. इतक्या वर्षात मी बघितलं की, सचिन अहिर जो आहे हे निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहे. सर्वांशी चांगले संबंध ठेऊन काम करणारे सचिन आहिर (Sachin Ahir) आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर देखील भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत उपसभापती म्हणून ज्यांनी काम केलं त्या नीलम गौऱ्हेंचे (Neelam Gorhe) देखील मी अभिनंदर करतो. त्यांनी उपसभापतीची भूमिका बजावताना चांगलं काम केलं. मधल्या काळात संघर्षाचा काम होता, त्यावेळी देखील त्यांनी चांगलं काम केलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच; पक्षफोडीवर राज ठाकरेंचा घणाघात
योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात सचिन अहिर हुशार
पुढे बोलताना सचिन अहिर म्हणाले की, सचिन अहिर 1999 साली विधानसभेत आमदार झाले. त्यानंतर 3 वेळा निवडून आले. 2009 साली राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. सचिन अहिर यांची दहीहंडी विशेष चर्चेत असायची. सामाजिक क्षेत्रात चांगलं काम आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात ते हुशार आहेत. ज्यावेळी सभागृहात ते आले त्यावेळी ते धनुष्यबाण चिन्हावर आले. त्यामुळे बदल असा काही घडलं नाही असं देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.