अखेर सचिन अहिरांच्या हाती धनुष्याबाण! विधानपरिषद उपसभापतीपदाच्या अर्जानंतर पक्षप्रवेशही झाला

UBT MLA Sachin Ahir join Shivsena यांनी शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर आता त्यांनी अधिकृतपणे पक्ष प्रवेशही पार पडला आहे.

UBT MLA Sachin Ahir Join Shivsena

UBT MLA Sachin Ahir finally official join Eknath Shindes Shivsena : शिंदेंकडून ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता त्यांनी अधिकृतपणे पक्ष प्रवेशही पार पडला आहे. पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत या पक्षप्रवेशाची घोषणा केली.

Vikram Shinde : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी विक्रम शिंदे यांची निवड

या पत्रकार परिषदेत सचिन आहिरांची माहिती देतानाच शिंदेंनी मिश्किलपणे सचिन अहिर ऐवजी त्यांचं नाव सचिन तेंडुलकर असं घेतलं. ते चूकून झालं असलं तरी त्यांनी म्हटलं की, क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणे षटकार मारला आहे. जसा गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी मारला होता. तसाच आता अहिर यांनी मारला आहे. तसेच ते सचिन प्रमाणेच अष्टपैलू आहेत. बॅटींग बॉलिंग सगळ करतात. गुगली पण टाकतात. आज त्यांनी गुगलीच टाकली. तसेच एकनाथ शिंदे जे काही करतो. फुलप्रुफ करतो. असं म्हणत शिंदेंनी अहिरांच्या पक्षप्रवेशावर बोलले आहेत.

कायद्यातील पळवाटीचा फायदा एकनाथ शिंदेंनी उचलला; सचिन अहिर यांना पक्षांतरबंदीचा कायदा लागू होतो का ?

तर यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी भूमिका मांडली. त्यांनी शिंदेंचे आभार मानले. तसेच त्यांनी यावेळी आपली राजकीय भूमिका मी वेगळ्या व्यासपीठावर मांडेन असं अहिर म्हणाले. तसेच त्यांच्यासोबत असताना चांगले असतो गेले की, वाईट होतो. हे विचार दुर्देवी आहेत. तसच टीकेला योग्य वेळी उत्तर देईल तसेच ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवताय. असं म्हणत सचिन अहिर यांनी ठाकरेंवर नाराजी देखील  व्यक्त केली आहे.

 

follow us