Neelam Gorhe : काही लोकांना माझं नेतृत्व पसंत नसेल तर..,; नीलम गोऱ्हेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर

काही लोकांना माझं नेतृत्व मान्य नसेल तर त्यांनी उदय सामंतांच्या नेतृत्वाखाली काम करावं, असं विधान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लेट्सअपशी बोलताना केलंय.

Untitle (12)

Mla Neelam Gorhe : काही लोकांना माझं नेतृत्व मान्य नसेल तर त्यांनी उदय सामंतांच्या नेतृत्वाखाली काम करावं, पण पक्षाच्या कार्यक्रमाला न येणं हे चुकीचं असल्याचं परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Mla Neelam Gorhe ) यांनी स्पष्ट केलंय. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल पुण्यात लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षातील अंतर्गत कलह, पक्षासाठीचे योगदान यावर सडेतोडपणे भाष्य केलंय.

राजा शिवाजी चित्रपटाचा नवा विक्रम; सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला

पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, काही लोकांना माझं नेतृत्व पसंत नसेल तर त्यांनी उदय सामंत यांच्या नेतृत्वात काम करावं. आम्ही आमक्याबरोबर काम करणार नाही म्हणून पक्षाच्या कार्यक्रमाला यायचं नाही असं बोलत असतील तर या कार्यक्रणालीचं आत्मपरीक्षण करावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला जी जबाबदारी दिलीयं ती फक्त एका जिल्ह्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर आहे. समोरुन आणि पाठमागून जे कोणी पक्षाला खिळखिळ करण्याच प्रयत्न करत असतील, स्पर्धात्मक भूमिका ठेवत असतील तर त्यांनी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हा विधायक मार्ग स्विकरला पाहिजे,असा सल्लाही नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे.

बीडच्या आष्टीत बांधकाम विभागाचा तुघलकी कारभार; अतिक्रमण सांगून 21 गाळे पाडले, मेहबुब शेख आक्रमक

तसेच शिवसेना माझा प्राणवायू, त्याच्याशिवाय मी कामाचा विचारही करु शकत नाही. शिवसेना म्हणून जे प्रश्न घेतो ते प्रश्न मांडताना आम्हाला सातत्याने भूमिका घ्यावी लागते. अयोध्या राम मंदिर पीडित महिलांना न्याय मिळवून देणे. अतिरेक्यांच्याविरोदात उभं राहणं. केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि पंतप्रधान मोदींच्या मार्गावरच आम्ही काम करीत आहोत. उपसभापती म्हणून मला अनेक ठिकाणी बैठका घेता आल्या. रा.सू. गवई आमच्यासाठी आदरणीय आहेतच, कोणाचं रेकॉर्ड तोडायचं नाही. पक्ष जी काही संधी देईल ती स्विकारुन काम करणार असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंय.

उत्तर प्रदेश हादरलं! कामासाठी निघालेल्या मजुरांच्या मॅजिक व्हॅनचा भीषण अपघात; 9 जणांचा दुर्दैवी अंत

दरम्यान, शिवसेनेच्या योगदानाबद्दल बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेवर जेव्हा संकटे आली तेव्हा 12, 13 ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या, त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब इतर नेत्यांसोबत मी एक महिला म्हणून राहिेले. काही ठिकाणी आमच्यावर हल्लेही झाले. मला स्वत:च्या तोंडाने संगायची वेळ येणं म्हणजे दुर्देव वाटतं. काही लोकं तेव्हा शाळेत असतील त्यांच्या अज्ञानावर मी टीका करणार नाही. शिवसैनिकाला कोणी वाली नाही त्यांच्यामागे मी उभी राहिलीये. काही लोकं टोळकेमध्ये असतात ते नंतर पळून गेलेल दिसतात, अशीही टीका नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केलीयं.

follow us