Video : तंत्र-मंत्राचा उल्लेख अन् तटकरे, गोऱ्हे, पंकजांचं नाव; परबांनी सभागृहात दाखवलं लिंबू-मिर्ची

Video : तंत्र-मंत्राचा उल्लेख अन् तटकरे, गोऱ्हे, पंकजांचं नाव; परबांनी सभागृहात दाखवलं लिंबू-मिर्ची

Anil Parab Reaches With Limbu Mirchi In Monsoon Session 2025 : राज्य विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session 2025) एक वेगळ्याच प्रकारचा विषय चर्चेला आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते अनिल परब (Anil Parab) थेट लिंबू आणि मिरची घेवून सभागृहात पोहोचले होते. त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून अनोख्या पद्धतीने चिंता व्यक्त केली. पालकमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील काही अघोरी प्रकारांवरून चिंता व्यक्त करत ‘एक भाऊ म्हणून मला माझ्या बहिणीची भीती वाटते,’ असं विधान (Aaditi Tatkare) सभागृहात केलं.

सभागृहात बोलताना अनिल परब म्हणाले, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचं भान मला आहे. जसं पंकजाताई, आदितीताई, माधुरीताई या आमच्या बहिणी आहेत, त्यांची सुरक्षा राखणं हे माझं कर्तव्य आहे. सध्या रायगडमध्ये जे काही तांत्रिक आणि अघोरी प्रकार सुरू आहेत, ते पाहता माझ्या बहिणीला काही नुकसान होऊ नये, यासाठी मी एक भावाच्या नात्याने उपाय करत आहे.

आमदार प्रसाद लाड यांचा एआय आवाज, बनावट लेटरहेड वापरून उडवला ३ कोटी २० लाखांचा निधी

‘लिंबू-मिरची’ अन् सुरक्षा कवच

परब यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं की, मी अंधश्रद्धा मानत नाही. परंतु काही सोशल मीडियावर रेडे, बैलांचे बळी देण्याचे प्रकार, तांत्रिक विधी याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे मी माझ्या बहिणीला कोणतीही ईडा-पीडा लागू नये म्हणून सुरक्षा कवच म्हणून लिंबू देतोय. हा अंधश्रद्धेचा प्रचार नाही. हे भावाचं कर्तव्य आहे, असं म्हणत परबांनी लिंबू मिर्ची वर काढत सभागृहाला दाखवलं.

यावर विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘मी लिंबू तपासून घेते,’ असं म्हटल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर परब यांनी “हे लिंबू प्रभावी आहे,” असा दावा करत संपूर्ण विषयात विनोद आणि तणाव यांचा समतोल साधला.

‘इथं बाप बसलाय…’ वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

सरकारी सुरक्षा योजना 

परब यांनी राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या सुरक्षा योजनांवरही भाष्य केलं. सरकारने लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयांची योजना आणली, कायदे केले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला बळ मिळालं आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधींना किमान एक वर्ष तरी सुरक्षितता मिळावी, हे महत्त्वाचं आहे, असं परब म्हणाले आहेत.

पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेवर अप्रत्यक्ष टोला

या वक्तव्यातून परब यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं, तरी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खासकरून आमदार आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube