आमदार प्रसाद लाड यांचा एआय आवाज, बनावट लेटरहेड वापरून उडवला ३ कोटी २० लाखांचा निधी

MLA Prasad Lad : बीड जिल्हा गेल्या एक वर्षाभरापासून वाढत्या गुन्हेगारी आणि विविध घोटाळ्यांमुळे चर्चेत आहे. आताही बीडमध्ये (Beed) एक धक्कादायक प्रकार समोर आला. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांचे बनावट लेटरहेड आणि सही वापरून ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी वर्ग केल्याचा प्रकार बीडमधून उघडकीस आला. आमदार लाड यांनी स्वतः विधान परिषदेच्या (Legislative Council) सभागृहात ही माहिती दिली.
दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण, निवड कशी होते? जाणून द्या सर्वकाही
माझी खोटी सही व बनावट लेटरहेडचा वापर करून 3.20 कोटींचा निधी वळवण्याचा गंभीर प्रकार उघड!
याबाबत आज विधान परिषदेत आवाज उठवला. रत्नागिरी जिल्ह्यातील निधी बीडला वळवण्याचा कट उघड झाला; माझ्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे! सरकारने अशा प्रकारांना… pic.twitter.com/csbmTbG6Fj— Prasad Lad (@PrasadLadInd) July 2, 2025
बनावट लेटरहेड अन् खोट्या सहीचा वापर
रत्नागिरी येथे लाड यांच्या नावाचे बनावट लेटरहेड आणि त्यांची खोटी सही वापरून बीड जिल्ह्यात ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला. लाड यांच्या आवाजात एआय कॉल करून निधी त्वरित वर्ग करा, असं रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं. त्यानंतर, हा निधी वर्ग करण्यात आल्याचा प्रकार घडला. आमदार लाड यांनी स्वतः सभागृहात माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, रत्नागिरी येथील अधिकाऱ्याला या व्यवहारात संशय आल्यावर त्यांनी आमदार लाड यांच्याशी पत्राबाबत आणि कॉलबाबत खात्री करण्यासाठी फोनवरून संवाद साधला. संभाषणादरम्यान लाड यांनी कोणतीही अधिकृत विनंती केली नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ही बनावट पत्रव्यवहार आणि एआयच्या माध्यमातून झालेली फसवणूक उघडकीस आली.
‘इथं बाप बसलाय…’ वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
लाड म्हणाले, काल (मंगळवारी) दुपारी ४.३० वाजता एआयचा वापर करत एक कॉल आला होता. त्या कॉलवरून निधी संदर्भात बोलले, लेटरहेडवरील स्वाक्षरीही खोटी केली आहे. माझ्या नावाचा गैरवापर करून निधी चोरण्याचे काम झाले आहे. याबाबत सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली, असं लाड यांनी सांगितलं.
तसेच, पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्या कानावर देखील ही घटना घतली आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे नाव समोर आल्यावर मीअजून सावध झालो, असेही लाड यांनी म्हटले.
दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असताना चार लोकांची नावही समोर आली असून असून एकाचं नाव बंडू आह, तो सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलीस लवकरत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करतील, असंही लाड यांनी म्हटलं आहे.