दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण, निवड कशी होते? जाणून घ्या सर्वकाही

Dalai Lama Selection Process : तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) लवकरच आपल्या उत्तराधिकारीची निवड जाहीर करणार आहे.

Dalai Lama Selection Process

Dalai Lama Selection Process : तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) लवकरच आपल्या उत्तराधिकारीची निवड जाहीर करणार आहे. त्यांनी यासाठी नुकतंच एक व्हिडिओ मेसेज देत पुढील दलाई लामाची निवड 600 वर्षे जून्या संस्थेद्वारे होणार असल्याची माहिती दिली आहे. 15 व्या दलाई लामाची निवड गादेन फोड्रांग ट्रस्टद्वारे (Gaden Phodrang Trust) करण्यात येणार असून त्यांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याबाबतही निर्णय घेणार असल्याची माहिती दलाई लामा यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे दिली आहे. 14 वे दलाई लामा 6 जुलै रोजी 90 वर्षाचे होणार असून त्या दिवशी ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल आणि त्यांची निवड कशी होणार याबाबत घोषणा करणार आहे.

तर दुसरीकडे दलाई लामा यांच्या या घोषनेनंतर पुन्हा एकदा चीन (China) आणि दलाई लामा यांच्यात सघर्ष सुरु झाला आहे. चर्चांनुसार, चीनी हस्तक्षेप रोखण्यासाठी दलाई लामा परंपरा बदलणार असल्याची शक्यता आहे. ते त्यांचा उत्तराधिकारी ॲडव्हान्समध्ये घोषित करु शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून चीन आणि दलाई लामा यांच्यात सघर्ष सुरु असून चीनने 14 वे दलाई लामा यांना बंडखोर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे 1959 मध्ये ल्हासामध्ये चिनी राजवटीविरुद्ध झालेल्या बंडानंतर दलाई लामा भारतात आले होते. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? दलाई लामा यांची निवड कशी केली जाते आणि पुनर्जन्मानंतर दलाई लामाचा अवतार कोण आहे हे कसे ठरवले जाते.

दलाई लामा एक धार्मिक पद  

हे जाणून घ्या की , दलाई लामा हे नाव नसून एक धार्मिक पद आहे. सध्या 14 वे दलाई लामा आहे आणि त्यांचे खरे नाव तेन्झिन ग्यात्सो आहे. तिबेटी नागरिक सर्वोच्च धार्मिक नेत्याला दलाई लामा म्हणतात. सध्याचे दलाई लामा यांची निवड वयाच्या दुसऱ्या वर्षी करण्यात आली होती आणि त्यांना 14 व्या वर्षी ल्हासा येथे आणण्यात आले.

दलाई लामा यांची निवड कशी केली जाते?

माहितीनुसार, दलाई लामा यांची निवड आध्यत्मिक प्रक्रियेद्वारे केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया तिबेटी बौद्ध धर्माच्या श्रद्धेवर आधारित असते. तिबेटी बौद्ध धर्माचा असा विश्वास आहे की, दलाई लामा पुनर्जन्म घेतात. त्यामुळे जेव्हा दलाई लामा यांचा निधन होते तेव्हा त्यांना शोधण्याची प्रक्रिया सुरु होते. मात्र कोणता मुलगा दलाई लामा होईल हे बहु-टप्य्यांच्या प्रक्रियेनंतर ठरवले जाते.

दलाई लामा यांचा अवतार भविष्यवणीच्या आधारे शोधला जातो यासाठी मृच शरीराची दिशा, त्यांचे स्वप्ने, पवित्र सरोवरात दिसणारे कोणतेही विशेष दर्शन आणि दिवंगत दलाई लामाच्या शेवटच्या काळातील चिन्हे या आधारावर दलाई लामा यांचा शोध घेण्यात येतो. दलाई लामा यांचा संभाव्य अवतार शोधल्यानंतर, त्यांना मागील दलाई लामाच्या काही गोष्टी दाखवल्या जातात ते त्या गोष्टी ओळखू शकतात की नाही हे पाहिले जाते आणि जर त्यांनी ते ओळखले तर त्यांना गुरुचा पुनर्जन्म मानले जाते. यानंतर, तिबेटी धार्मिक अधिकाऱ्यांकडून पुष्टी मिळाल्यानंतर पुढील दलाई लामाची घोषणा करण्यात येते. दलाई लामाच्या अधिकृत घोषणेनंतर, त्यांना बौद्ध धर्माच्या शिकवणी शिकवल्या जातात. त्यांना धार्मिक दीक्षा दिली जाते आणि तिथल्या परंपरांचा भाग बनवले जाते.

दलाई लामाचे पद महत्त्वाचे का आहे?

दलाई लामा हे तिबेटी बौद्धांचे आध्यात्मिक प्रमुख आहेत. त्यांचे जीवन दया, करुणा, अहिंसा आणि ज्ञान या आदर्शांवर आधारित आहे. बौद्ध धर्माला पुढे नेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना तिबेटी ओळख आणि संस्कृतीचे रक्षक म्हणूनही ओळखले जाते. दलाई लामा हे तिबेटी लोकांच्या, विशेषतः निर्वासित जीवन जगणाऱ्यांच्या आशांचे प्रतिनिधित्व करतात. 1959 पर्यंत दलाई लामा धर्म आणि राजकारण या दोन्हींचे प्रमुख होते. सध्या 14 वे दलाई लामा राजकारणातून निवृत्त झाले आहेत. विशेष म्हणजे बौद्ध धार्मिक गुरु असूनही, त्यांचे संदेश आणि शिकवण सर्व धर्म आणि संस्कृतींसाठी प्रेरणादायी आहेत.

दलाई लामा यांची एकूण संपत्ती किती ?

विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार, दलाई लामा यांची एकूण संपत्ती 150 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर ती सुमारे 1,300 कोटी रुपये असू शकते.

दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण, थेट इशारा देत ड्रॅगन संतापला, म्हणाला जर आमच्या मान्यतेशिवाय…

दलाई लामा यांची संपत्ती प्रामुख्याने मोठी भाषणे, पुस्तक विक्री, देणग्या आणि खाजगी शिकवणींमधून निर्माण होते. माहितीनुसार, दलाई लामांना दिलेल्या सर्व देणग्या विविध मानवतावादी आणि शैक्षणिक प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी वापरल्या जातात.

follow us