अजितदादांच्या विमानाला तांत्रिक बिघाड झाला का?, विमान मालक अन् मंत्र्यांची प्रतिक्रिया काय?
अजित पवार प्रवास करत असलेले विमान VSR (व्हीएसआर) या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट 45 (Learjet 45) हे या विमानाचे मॉडेल होते.
राज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती (Baramati) येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यासह आणखी चार जण प्रवास करत होते, या सर्वांचा या विमान अपघात मृत्यू झाला आहे. दरम्यान व्हीएसआर एव्हिएशन (VSR Aviation / VSR Ventures) विमान कंपनीचे मालक आणि डायरेक्टर व्ही. के. सिंह (विजय कुमार सिंह) यांच्यासह केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले विमानाचे मालक व्ही. के. सिंह?
आमच्या रेकॉर्ड आणि माहितीनुसार हे विमान (Learjet 45, रजिस्ट्रेशन VT-SSK) १००% सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे फिट होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या आणि चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असावा असे वाटत नाही.
त्याचबरोबर लँडिंगच्या वेळी बारामती परिसरात वातावरण स्वच्छ (visibility) नव्हते. धुके किंवा खराब हवामानामुळे पायलटला रनवे नीट दिसला नसावा. वैमानिक अनुभवी होते. मुख्य पायलटकडे १६,००० तासांहून अधिक उड्डाण अनुभव होता आणि सह-पायलटकडेही पुरेसा अनुभव होता. तरीही नेमकं कारण DGCA आणि AAIB (Aircraft Accident Investigation Bureau) च्या तपासणीनंतरच समजेल, असंही ते म्हणाले.
विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू काय म्हणाले?
माझं हृदय जड झाल आहे, ही गोष्ट पचण्यासारखी नाही, आमची अजित पवार यांच्यासोबत भेट व्हायची, ते सातत्याने मार्गदर्शन करायचे. त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड होता. त्यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्यासारखा नेता आता मिळणं अवघड आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास सुरू केला आहे. जेव्हा विमान उतरवण्याचा प्रयत्न सुरु होता तेव्हा, त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला अशी प्रतिक्रिया यावेळी राम मोहन नायडू यांनी दिली आहे.
विमान वाहतूक राज्यमंत्री मोहळ काय म्हणाले?
दरम्यान या अपघातावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुरलीधर मोहळ यांचे डोळे पाणवले आहेत, अनपेक्षित धक्का आहे. अजूनही यावर विश्वास बसत नाही. अजितदादा यांची प्रशासनावर प्रचंड पकड होती. दादा आपल्यात नाहीत याचं दुःख होत आहे. आपल्या सगळ्याचं नुकसान झालं आहे. दादा आता नाहीत हे बोलण सुद्धा वेदना देणारं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोजके नेते सर्वपक्षीय नेत्यांच्या मानावर राज्य करतात, त्यात दादांचा समावेश होतो. दादांशिवाय पुण्याच राजकारण कल्पनाच करता येत नाही. हा सगळ्यांवरच प्रचंड मोठा अघात आहे. मला आज काय बोलावं सूचत नाही, असं मोहळ यांनी म्हटलं आहे.
डीजीसीए माहिती
रजिस्ट्रेशन VT-SSK
उत्पादनाचे वर्ष – 2010
सी किंवा आर समस्या -27/12/2022
सी किंवा ए समस्या – 16/12/2021
सी आर सी समस्या – 10/12/2021 ते 14/09/2026 पर्यंत वैध
नवीन असल्यापासूनचा वेळ (TSN) नवीन असल्यापासूनची सायकलची संख्या 4915:48
शेवटच्या वेळेपासूनची स्थिती (विमान योग्यता पुनरावलोकन) – 85:49 तास
Press note on Learjet 45 Aircraft VT-SSK crash at Baramati Airport of M/s VSR Ventures Pvt Ltd pic.twitter.com/Exah9xCTBl
— DGCA (@DGCAIndia) January 28, 2026
