धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडमुळेच पंकजा मु्डेंचा लोकसभेला पराभव, सुरेस धसांचा गौप्यस्फोट
Suresh Dhas : लोकसभा निवडणुकीत बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव का झाला? याचा गौप्यस्फोट आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यामुळेच पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पडल्या, असा दावा धस यांनी केला.
सुरेश धस आणि वाल्मिक कराड दोघांचीही चौकशी झाली पाहिजे…; एकनाथ खडसेंची मागणी
सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिणीला मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यापेक्षा बीडमध्ये आक्काची दहशत जास्त आहे. वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांना वश केलं. धनंजय मुंडेंना मित्रच शिल्लक राहिला नाही. कारण आकाने त्यांचा मित्रच शिल्लक ठेवला नाही, तसेच लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे खूप चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचं वाटोळं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलं. तेव्हापासून बजरंग सोनवणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पडल्या नसत्या, असंही धस म्हणाले.
Video: मोठी बातमी! प्रशांत किशोरला बिनशर्त जामीन मंजूर, तुरुंगातून सुटका
पुढं ते म्हणाले, दुसऱ्या कोणालाही उमेदवारी दिली असती तरीही पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या. सोनवने यांच्यासारख्या तगडा उमेदवार तिकडं गेल्याने फटका बसला. छाती फाडली तर एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे दिसतील, असं बजरंग सोनवणे म्हणाले होते. पण पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे झाला.
लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी माझा गैरसमज करून घेतला. आता तो माझ्याबद्दलच का झाला ते मला माहित नाही. पंकजा मुंडेंची सीट निवडून आली नाही कारण, लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात 98 हजार मते विरोधकांकड गेली. ही मते कोणामुळे गेली? यांच्याच कृपेमुळे आम्ही हरलो. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या दहशतीमुळे आणि वागणुकीमुळेच पंकजा पराभूत झाल्या.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे अनेक जण पंकजा मुंडेंवर आजही नाराज आहेत, असा दावाही धसांनी केला.