Video: मोठी बातमी! प्रशांत किशोरला बिनशर्त जामीन मंजूर, तुरुंगातून सुटका

Video: मोठी बातमी! प्रशांत किशोरला बिनशर्त जामीन मंजूर, तुरुंगातून सुटका

Prashant Kishor : बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जन सूरजचे संस्थापक प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना बिनशर्त जामीन मिळाला आहे. न्यायालयाने आज त्यांना बिनशर्त जामीन मंजूर केला आहे. माहितीनुसार, बिनशर्त जामीन मिळाल्यानंतर थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे.

प्रशांत किशोर यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर काही तासांतच बिनशर्त जामीन मिळाला आहे. रात्री 8 वाजता कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. बीपीएससी कथित पेपर फुटल्यानंतर बीपीएससी (BPSC) परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असताना प्रशांत किशोर यांना गांधी मैदानातून अटक करण्यात आली होती.

माहितीनुसार, बीपीएससीची 70 वी पीटी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून प्रशांत किशोर उपोषणाला बसले होते मात्र त्यांना सोमवरी अटक करण्यात आली होती यानंतर पाटणा दिवाणी न्यायालयाने सशर्त जामीन नाकारल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती मात्र तुरुंगातूनही आपले उपोषण सुरूच राहणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. यानंतर त्यांची फतुहा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने त्यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पण प्रशांत किशोर सशर्त जामीन घेण्यास तयार नव्हते त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. तर आता न्यायालयाने त्यांना बिनशर्त जामीन मंजूर केल्याने थोड्याच वेळात त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.

माहितीनुसार, बिहार लोकसेवा आयोगाने 13 डिसेंबर रोजी 70वी प्राथमिक परीक्षा घेतली होती. यामध्ये हेराफेरीचा आरोप करत उमेदवारांनी पाटणाच्या गार्डनीबागमध्ये आंदोलन केले होते. यानंतर दोनवेळा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि या प्रकरणाला राजकीय उधाण आले. प्रशांत किशोर यांच्यापासून तेजस्वी यादव, पप्पू यादव यांनी सरकार विरोधात आंदोलन केले. या प्रकरणी प्रशांत किशोर यांच्या विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर पप्पू यादव यांच्यासह काँग्रेस-डाव्या आमदारांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये ‘ट्विस्ट’, 2027 पासून ICC लागू करणार नवीन सिस्टम, जाणून घ्या सर्वकाही

follow us
  • fb
  • instagram
  • youtube