टेस्ट क्रिकेटमध्ये ‘ट्विस्ट’, 2027 पासून ICC लागू करणार नवीन सिस्टम, जाणून घ्या सर्वकाही

टेस्ट क्रिकेटमध्ये ‘ट्विस्ट’, 2027 पासून ICC लागू करणार नवीन सिस्टम, जाणून घ्या सर्वकाही

Test Cricket New Rules : आयसीसी कसोटी क्रिकेटला अधिक मनोरंजक बवण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 2027 पासून आयसीसी (ICC) कसोटी क्रिकेटसाठी (Test Cricket) दोन ग्रुप तयार करणार आहे. एका ग्रुपमध्ये भारत, ऑस्ट्रेलियासह (Australia) पाकिस्तान (Pakistan) , दक्षिण आफ्रिका (South Africa) , न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) सारख्या संघांचा समावेश असणार आहे तर दुसऱ्या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज, बांग्लादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड या सारख्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे.

मोठे संघ एकमेकांविरोधात जास्तीत जास्त मालिका खेळावे या पाठीमागचा उद्देश आहे. मोठ्या संघात मालिका झाल्याने जास्त चाहते कसोटी क्रिकेटकडे आकर्षित होऊ शकतात असं आयसीसीला वाटत आहे. त्यामुळे आयसीसी 2027 पासून कसोटी क्रिकेटमध्ये नवीन सिस्टम लागू करण्याचा विचार करत आहे. याबाबत आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माइक बेयर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांच्याशी चर्चा करणार आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेच्या विक्रमी उपस्थितीनंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे, ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामने खेळले गेले. दहा वर्षांनंतर ही मालिका जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. या मालिकेत प्रेक्षकांच्या संख्येबाबत अनेक विक्रम झाले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात जास्त नॉन-एशेस मालिका होती, ज्यामध्ये 837,879 लोक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते.

ICC ची नवीन सिस्टम काय आहे?

अहवालानुसार, 2027 नंतर कसोटी सामन्याची दोन भागात विभागणी केली जाऊ शकते. ही सिस्टम लागू झाल्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांविरुद्ध अधिक सामने खेळू शकतील. या सर्व संघांना 1 विभागात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यासारख्या इतर संघांना डिव्हिजन 2 मध्ये स्थान दिले जाईल जे कसोटी क्रिकेटमध्ये तुलनेने कमकुवत मानले जातात.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रूग्ण नाही, मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, आरोग्य सेवा संचालनालयाने केले आवाहन

यामध्ये बांगलादेश आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांचा समावेश असू शकतो, ज्यांना अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळालेले नाही. या फॉरमॅटमध्ये, अव्वल संघ एकमेकांशी स्पर्धा करतील, तर तळाचे संघ केवळ त्यांच्या विभागापुरते मर्यादित असतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube