कसोटीत टी 20 स्टाईल विजय; धुवाधार फलंदाजी करत इंग्लंडने सामना जिंकला, न्यूझीलंड पराभूत
New Zealand vs England 1st Test : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात (New Zealand vs England) चमकदार खेळ करत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. कसोटी सामना असतानाही (Test Cricket) इंग्लंडने टी 20 स्टाइलमध्ये फलंदाजी करत फक्त 12.4 ओव्हर्समध्येच सामना जिंकला. इंग्लंडकडून जेकब बीथलने 37 चेंडूत 50 धावा केल्या. तर जो रुटने 15 चेंडूत 23 धावा करत नाबाद राहिला. सामन्यात दहा विकेट घेणारा ब्रायडेन कार्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
या सामन्यात इंग्लंडला (England) विजयासाठी 104 धावा करायच्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजानी सुरुवातीपासूनच वेगवान खेळ केला. न्यूझीलंडने पहिल्या डावात एकूण 348 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 499 धावा केल्या. हॅरी ब्रूकने 171 धावांची खेळी केली.
दुसऱ्या डावात न्यूझीलंड फक्त 254 धावा (New Zealand)करू शकला. यामुळे इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी 104 धावांचे माफक आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी टी 20 सामन्याच्या स्टाइलने फलंदाजी करत सामना जिंकला.
अंडर-19 आशिया चषकात भारताला धक्का, हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानकडून 44 धावांनी पराभव
न्यूझीलंडकडून केन विलियमसनने शानदार कामगिरी केली. पहिल्या डावात 93 आणि दुसऱ्या डावात 61 धावा त्याने केल्या. याच सामन्यात विलियमसनने 9 हजार धावांचा टप्पाही गाठला. न्यूझीलंड क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात 9 हजार धावा पूर्ण करणारा विलियमसन हा एकमेव खेळाडू ठरला आहे.
पहिल्या डावात गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गस एटकिंसनने दोन विकेट घेतल्या. ब्रायडेन कार्सने 4 विकेट्स घेतल्या. फिरकी गोलंदाज शोएब बशीरनेही चार विकेट्स घेतल्या. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात हॅरी ब्रुकने 171 धावांची खेळी केली. ओली पोपने 77 तर कर्णधार बेन स्टोक्सने 80 धावा केल्या. याव्यतिरिक्त ब्रायडेन कार्सने नाबाद 33 आणि गस एटकिंसनने 48 धावा केल्या. दुसऱ्या डावात किवी टीमकडून डेरिल मिचेलने सर्वाधिक 84 धावा केल्या. या डावात इंग्लंडच्या कार्सने 6 विकेट घेतल्या. क्रिस वोक्सला तीन विकेट मिळाल्या.
हायब्रीड स्पर्धा भरवा नाहीतर बाहेर पडा; आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा