अंडर-19 आशिया चषकात भारताला धक्का, हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानकडून 44 धावांनी पराभव

  • Written By: Published:
अंडर-19 आशिया चषकात भारताला धक्का, हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानकडून 44 धावांनी पराभव

IND vs PAK U19 Asia Cup Match :  अंडर-19 आशिया कप 2024 मध्ये (IND vs PAK U19 Asia Cup) भारतीय संघाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. आज पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला 282 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र प्रत्युत्तरात भारतीय संघ 47.1 षटकांत केवळ 237 धावाच करू शकला. 282 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि अवघ्या 51 धावात भारताने आपले टॉप तीन विकेट गमावले. मात्र त्यानंतर निखिल कुमारने 67 धावा केले. या दरम्यान त्याने  सहा चौकार आणि तीन षटकार मारले. तर मोहम्मद अननने दोन चौकार आणि दोन षटकारच्या मदतीने 30 धावा केले. पाकिस्तानकडून अली रझाने तीन तर अब्दुल सुभान आणि फहम उल हक यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतले.

तर दुसरीकडे या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने  50 षटकांत 7 गडी गमावून 281 धावा केल्या होत्या.  सलामीवीर शाहजेब खानने शतक झळकावले. त्याने 147 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 159 धावा केल्या. भारताकडून समर्थ नागराजने तीन आणि आयुष म्हात्रेने दोन तर किरण चोरमले आणि युधाजित गुहा यांनी प्रत्येकी एक – एक विकेट घेतला.

मोठी बातमी : अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेत मोठी चूक, ग्रेटर कैलासमध्ये हल्ला; पाहा व्हिडिओ

पाकिस्तानकडून  शाहजेब आणि उस्मान खानने पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली.  भारतीय संघाचा या स्पर्धेत दुसरा सामना जपान विरुद्ध होणार आहे. अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत 8 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube