मोठी बातमी : अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेत मोठी चूक, ग्रेटर कैलासमध्ये हल्ला; पाहा व्हिडिओ

  • Written By: Published:
मोठी बातमी : अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेत मोठी चूक, ग्रेटर कैलासमध्ये हल्ला; पाहा व्हिडिओ

Arvind Kejriwal : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. माहितीनुसार, दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात पदयात्रेदरम्यान केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या यात्रेदरम्यान एका व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर द्रव फेकण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना दिल्लीचे मंत्री म्हणाले की, सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwa) देशातील सर्व राज्यात भाजप नेते सभा घेतात मात्र त्यांच्यावर हल्ले होत नाही. मात्र अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. नांगलोईमध्ये भाजपने त्यांच्यावर हल्ला केला. छतरपूरमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. असं मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर देखील टीका केली. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून केंद्र सरकार आणि गृहमंत्री काहीही करत नसल्याचे ते म्हणाले.

‘त्यात आमचा दोष काय?’, बाबा आढावांसमोरच EVM वर अजितदादांचे स्पष्टीकरण

तर दुसरीकडे या यात्रेदरम्यान केजरीवाल यांनी पंचशील पार्क परिसरात नुकतीच चाकूने हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी केजरीवाल पीडित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, कारण या घटनेमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. संपूर्ण दिल्लीतील व्यापाऱ्यांना खंडणीचे कॉल येत आहेत. दिल्लीत गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. शहरात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. अशी टीका केंद्र सरकारवर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube