Liquor Scam : केजरीवालांनी चौकशीत सांगितली आतिशी अन् सौरभ भारद्वाज यांची नावे; ईडीचा मोठा दावा

  • Written By: Published:
Liquor Scam : केजरीवालांनी चौकशीत सांगितली आतिशी अन् सौरभ भारद्वाज यांची नावे; ईडीचा मोठा दावा

नवी दिल्ली : कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीची कोठडी संपल्यानंतर आज (दि.1) मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना (Arvind Kejriwal) 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, यावेळी ईडीने न्यायालयात मोठा दावा केला आहे. ज्यात चौकशीदरम्यान केजरीवाल यांनी आतिशी आणि सौरभ यांची नावे घेतल्याचे सांगितले. मद्य घोटाळ्यात अटकेत असलेले विजय नायर मला नव्हे तर, आतिशी आणि सौरभ यांना रिपोर्टिंग करत असल्याची माहिती केजरीवलांनी दिल्याचे ASG एसव्ही राजू यांनी न्यायालयात सांगितले. केजरीवालांच्या या माहितीमुळे आता आतिशी आणि सौरभ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून या दोघांनाही अटक होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्यावेळी उत्पादन शुल्क धोरण आणण्यात आले तेव्हा हे दोघेही मंत्री नव्हते. तर फक्त आमदार आणि प्रवक्ते होते. (Arvind Kejriwal named Atishi and Saurabh Bharadwaj during interrogation, ED tells court)

मोहिते-पाटलांचे ठरेना… माढ्याच्या मैदानात नवा भिडू; प्रवीण गायकवाडांनी घेतली पवारांची भेट

आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या आणि ओन्ली मच लाउडर (OML) इव्हेंट कंपनीचे माजी सीईओ विजय नायर यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) 2022 मध्ये अटक केली आहे. ज्यावेळी राजू यांनी आतिशी आणि सौरभ यांची नावे घेतली त्यावेळी दोन्ही मंत्री कोर्टरूममध्ये उपस्थित होते. त्यांच्या नावांचा अचानक उल्लेख झाल्याने या दोघांनाही मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. कथित मद्य घोटाळ्यात आतापर्यंत आपचे खासदार संजय सिंह आणि मनीष सिसोदिया तिहार तुरूंगात असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेले केजरीवाल हे सर्वात हाय-प्रोफाइल नेते आहेत.

Ravindra Dhangekar यांच्या मदतीला भुजबळ; ट्रोलिंग नको, शिक्षणापेक्षा मनापासून काम करणे महत्वाचे

ईडीने काय केला खुलासा?

आज न्यायालयात ईडीने केलेल्या खुलाश्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान कबूल केले की, विजय नायर हे आतिशी आणि सौरभ भारद्वाजला रिपोर्ट करत असे. नवीन दारू धोरणाच्या अंमलबजावणीबाबत विजय नायर कोणाच्या सांगण्यावरून किंवा सूचनेवरून मद्यविक्रेत्यांसोबत आणि आरोपींसोबत बैठक घेत होते असे विचारण्यात आले होते, परंतु  केजरीवाल यांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. तसेच केजरीवाल यांनी ईडी अधिकाऱ्यांना फोनचा पासवर्ड सांगण्यास नकार दिला. इतर कोणत्याही डिजिटल उपकरणाचा पासवर्ड त्यांनी दिला नाही. ते कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देत नसल्याचं एस व्ही राजू यांनी कोर्टाला सांगितले आहे.

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर केजरीवाल यांनी वकिलांकडून कोठडीत पुस्तके, औषधे, विशेष आहार आणि खुर्चीसाठी अर्ज केला आहे. तीन पुस्तके तुरुंगात नेण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे. भगवद्गीता, रामायण आणि ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड’ ही तीन पुस्तके वाचण्याची परवानगी मिळावी यासाठी केजरीवाल यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, यासंदर्भात न्यायालयाने अद्याप परवानगी दिलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज