कथित मद्य घोटाळा बनावट, आपला सत्तेतून खेचण्यासाठी खोटे गुन्हे दाखल; केजरीवालांचे मोदींवर टीकास्त्र
Arvind Kejriwal on PM Modi : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्मंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना अटक केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना समन्स बजावले होते. त्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं
IND vs AUS Final : फायनल सामना बरोबरीत राहिला तर विनर कोण? ICC ने आणला नवा नियम
आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांना कारागृहात पाठवून पक्ष संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. निवडणुकांत आपचा पराभव करता येत नाही, म्हणून भापज आप विरोधात असे डाव रचत आहे. लोकशाही मार्गाने दिल्लीत सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाची सत्ता बळजबरीने काबीज करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. सत्ता गमावण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमच्या नेत्यांची फसवणूक केली जात आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही त्यांना घाबरणार नाही, अशा शब्दात केजरीवाल यांनी ठणकावलं.
Chhagan Bhujbal : ‘माझा पराभव सोडाच, भुजबळ किती जणांना पाडेल याचा हिशोब करा’; भुजबळांचा इशारा
ते म्हणाले की, दिल्लीतील कथित दारू घोटाळा हा बनावट घोटाळा आहे. दिल्लीतील सरकार हटवण्यासाठी हा घोटाळा उभा केला आहे. खासदार संजय सिंह, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, विजय नायर यांना या बनावट घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. आता ते मला अटक करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचाही हाच उद्देश आहे की, त्यांना आम आदमी पक्षाच्या टॉप नेतृत्वाच्या नेत्यांना अटक करायची आहे. भाजपच्या मार्गात जो कोणी अडथळा ठरेल, त्याना येन-केन प्रकारे तुरूंगात टाकलं जातं आहे. पीएमएलए कायदा हा हत्यार म्हणून वापरला जातोय, अशी टीकाही त्यांनी केली.
दिल्लीतील सरकार खाली खेचायचे आहे. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. आम आदमी पक्ष निवडणुकीत पराभूत होऊ शकत नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचे केजरीवाल म्हणाले.
आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही. कारागृह आमच्यासाठी भूषण आहेत. जेल हे क्रांतिकारकांसाठी भूषण असतं. भगतसिंग तुरुंगात राहू शकतात, मनीष सिसोदिया 9 महिने तुरुंगात राहू शकतात, सत्येंद्र जैन एक वर्ष तुरुंगात राहू शकतात, मग मला तुरुंगात जायला काहीच अडचण नाही, असंही केजरीवाल म्हणाले.
आम्हाला सत्तेची लालसा नाही. 49 दिवसांत राजीनामा देणारा मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे. मला कोणीही राजीनामा देण्यास सांगितले नाही. आताही दिल्लीतील जनतेला विचारून मी राजीनामा देईन. मला राजीनामा द्यायला हवा की, जेलमधून सरकार चालवायला हवे, यासंबंधी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत आहे. दिल्लीतील लोकांच्या परवानगीशिवाय आम्ही काहीही करत नाही, असेही केजरीवाल म्हणाले.