Chhagan Bhujbal : ‘माझा पराभव सोडाच, भुजबळ किती जणांना पाडेल याचा हिशोब करा’; भुजबळांचा इशारा

Chhagan Bhujbal : ‘माझा पराभव सोडाच, भुजबळ किती जणांना पाडेल याचा हिशोब करा’; भुजबळांचा इशारा

Chhagan Bhujbal : निवडणुकीत माझा पराभव करण्याचं बोललं जात आहे. पण, माझा पराभव करणे सोडाच तुमच्या कित्येकांचा पराभव होईल. भुजबळ (Chhagan Bhujbal) कित्येकांना पाडेल याचा हिशोब करा. अज्ञानात राहू नका. आम्हालाही काहीतरी कळतं अशा सूचक शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. इगतपुरी येथील एका सभेत भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा मनोज जरांगेंवर निशाणा साधला. भुजबळ पुढे म्हणाले, आम्ही कुणाला नाही म्हणतोय. पण तुम्ही एकदमच सगळं घेऊन चाललेत. पंतप्रधान मोदींनी 10 टक्के आरक्षण दिलं. त्यामध्येही तुम्ही 85 टक्के, 60 टक्क्यांच्यावर 40 टक्के आहात. त्यामध्येही तुम्हीच. कुणबी प्रमाणपत्र घेऊन सुद्धा तुम्हीच. मग, बाकीच्यांनी कुठं जायचं असा सवाल भुजबळ यांनी केला.

Maratha Reservation: ‘छगन भुजबळांनी आगीत तेल ओतू नये, अन्यथा मराठा समाजाला’;अंबादास दानवेंचा थेट इशारा

आमचं कुठं चुकलं असेल तर सांगा. मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की मागील दोन महिन्यांपासून मला धमक्यांचे फोन येत आहेत. तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही. कायद्याचे राज्य आहे का, असा संतप्त सवाल भुजबळ यांनी केला.

अन्याय आजिबात सहन करू नका  

तुमच्याविरुद्ध काय बोललो आम्ही आमच्यात येऊ नका वेगळं घ्या. तुम्ही काहीही करा आणि आम्ही बोलायचं नाही. आम्ही काय मेंढरं आहोत का? तुम्हाला सुद्धा सांगून ठेवतो अन्याय सहन करायचा नाही. मग समोर कुणीही असो. अन्यायाला रोखण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचंय, असे भुजबळ उपस्थितांना म्हणाले.  आता म्हटलं जातंय की याला मंत्रीपदावरून काढा. अरे पण आयुष्यात आमदार होणं किंवा मंत्री होणं हेच सर्वस्व आहे का? छगन भुजबळच्या लेखी आमदारकी किंवा मंत्रीपदापेक्षा 374 जातीतील लोकांसाठी देशातील 54 कोटी लोकांसाठी छगन भुजबळ 35 वर्षे लढला आणि यापुढे देखील लढणार, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal : ‘संभाजीराजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत’ छगन भुजबळांनी संभाजीराजेंना सुनावलं

ठिकठिकाणी गावबंदी केली आहे. पण, लोकप्रतिनिधींचं मत जाणून घ्या. पटलं तर ठिक नाही पटलं तर निवडून देऊ नका. मात्र, दोन चार जण बॅनर लावतात. महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का. माझं पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी हे बॅनर तत्काळ काढून टाकावेत. या देशात कुणीही कुठेही जाऊ शकतो. फिरू शकतो. आपण त्याला आडकाठी करू शकत नाही. पोलिसांचं काम आहे. त्यांच्याकडून अॅक्शन कधी घेतली जाणार, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube