DGP Ramachandra Rao : मुलीने सोने तस्करीत नाक कापले; अन् आता बापाचे रंगेल व्हिडिओ व्हायरल

रान्याच्या प्रकरणाचा शेवट होत नाही तोच आता डीजीपी पदावर असलेल्या तिच्या वडिलांच्या अश्लील व्हिडिओंनी खळबळ उडाली आहे.

  • Written By: Published:
DGP Chandrashekhar Rao : मुलीने सोने तस्करीत नाक कापले; बापाचे रंगेल व्हिडिओ व्हायरल

DGP Ramachandra Rao Obscene Viral Video : एखादा गुन्हा एखाद्याचं करिअर अन् आयुष्य कसं उद्धस्त करू शकतो याचं उदाहरण म्हणजे कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक के रामचंद्र राव आणि त्यांची कन्या अभिनेत्री रान्या राव हे बाप लेक. DGP पदावर कार्यरत असलेल्या राव यांचे कार्यलयातील महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले अन् त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. राव यांच्या व्हायरल व्हिडिओंमुळे पोलील दलाची लाज निघाली आहे.  नेमकं बाप अन् लेकीने केलेले कांड काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

पोलीस महासंचालक पदाचा उल्लेख केला तरी अंगावर रोमांचं उभं राहतं. हे पद सहजासजही कुणालाही मिळत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. पण, जेव्हा एवढ्या मोठ्या पदावर काम करणारी व्यक्तीचं गैरवर्तन करू लागली तर, काय? दाद मागयची तरी कुणाकडे? पण, कायदा सर्वांसाठी समान आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने थेट निलंबन केलेले के. रामचंद्र राव.

अभेनेत्री असलेल्या मुलीने केली सोन्याची तस्करी

महिलेसोबत अश्लील वर्तन करणारे राव हे 1993 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, राव हे तेच अधिकारी आहेत ज्यांची मुलगी, अभिनेत्री रान्या रावला काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील सर्वात मोठ्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलीये. मार्च 2025 मध्ये, रान्याला दुबईवरून परतताना अटक करण्यात आली. त्यावेळी तिच्याकडे अधिकाऱ्यांना 14.8 किलो सोन्याचे बिस्किटं जप्त करण्यात आली. ज्याची किंमत अंदाजे 12.56 कोटींच्या घरात आहे. रान्याच्या अटकेनंतर, एजन्सींनी बेंगळुरूमधील लव्हेल रोडवरील तिच्या निवासस्थानी छापा टाकला, जिथे मोठ्या प्रमाणात मालमत्ता देखील जप्त करण्यात आली. या घडामोडींनंतर, कर्नाटक सरकारने मार्च 2025 च्या मध्यात राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.

रान्याच्या प्रकरणाचा शेवट होत नाही तोच आता डीजीपी पदावर असलेल्या तिच्या वडिलांच्या अश्लील व्हिडिओंनी खळबळ उडाली आहे. देशाची सेवा करण्यासाठी, देशाच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी समर्पित असलेले डीजीपी रामचंद्र राव यांच्या कार्यालयातील एका महिलेशी रोमान्स करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडालीये. ऑफिसमधील हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, एका व्हिडिओमध्ये राव त्यांच्या केबिनमध्ये एका महिलेसोबत अनुचित वर्तन करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे गैरकृत्य करताना राव गणवेशात असल्याचे सांगितले जातयं. पण, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ पूर्णपण खोटे आणि बनावट असल्याचे राव यांनी म्हटले आहे.

के रामचंद्र राव अन् वादाचा इतिहास

अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पदाला मुकलेले राव यांचे हे पहिलेच प्रकरण नाहीये. तर, त्यांचा आणि वादाचा जुना इतिहास आहे. राव यांनी आतापर्यंत पोलीस दलात अनेक जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. मात्र, या सर्वकाळात त्यांचा कार्यकाळ अनेक कायदेशीर तपास आणि अंतर्गत विभागीय चौकशीचा विषय राहिला आहे.

दक्षिण रेंजचे आयजीपी असताना राव यांचे नाव कथित पैसे जप्तीच्या वादात समोर आले होते. 2014 च्या सुरुवातीला, म्हैसूर दक्षिण पोलिसांनी म्हैसूरमधील येलवालजवळ कालिकतला जाणारी एक खाजगी बस थांबवली आणि केरळमधील चार व्यावसायिकांची रोख रक्कम जप्त केली. पोलिसांनी 20 लाख रुपये जप्त केल्याचा दावा केला, परंतु व्यावसायिकांनी प्रत्यक्षात रक्कम 2.27 कोटी रुपये असल्याचा दावा केला होता. त्याहीवेळी राव यांचे नाव चर्चेत आले होते.

follow us