‘2 वर्षांत 52 वेळा दुबईला… सकाळी जायची अन् संध्याकाळी’; DRI ने केला रान्या रावच्या सोनं तस्करीच्या संपूर्ण खेळाचा पर्दाफाश

Gold Smuggling Case Ranya Rao 52 Trips To Dubai : सोने तस्करी प्रकरणी पोलिसांनी कन्नड अभिनेत्री रान्या रावला (Ranya Rao) अटक केली होती. तिने मित्र तरूण राजूसोबत (Tarun Raju) दुबईला तब्बल 26 फेरल्या मारल्या. यादरम्यान त्यांनी सोन्याची तस्करी (Gold Smuggling Case) देखील केली, असं महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी आज न्यायालयात सांगितलं आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डीआरआयने न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान या प्रकरणाची नवीन माहिती उघड केलीय. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या प्रवास पद्धतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे दोघे सकाळी दुबईला जात होते अन् संध्याकाळी परतायचे. त्यांच्या या प्रवासामुळे संशय निर्माण होत होतो. तरुण राजूने दाखल केलेल्या जामीन अर्जाला डीआरआयने विरोध केल्याने ही टिप्पणी समोर आली.
अभिनेत्री हेमामालिनी यांच्या जगन्नाथ पुरी मंदिराच्या भेटीवरून वाद! पण नेमकं कारण काय?
बेंगळुरू विमानतळावरून रान्या रावला अटक केल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली, जिथे एजन्सीने तरूणला सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडलं. रान्या राव आणि तरूण राजू दोघांवरही सीमाशुल्क कायदा आणि तस्करी प्रतिबंधक क्रियाकलाप कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. तपासकर्त्यांना राजू आणि राव यांच्यात अधिक आर्थिक संबंध आढळले. त्यांनी रावने बुक केलेल्या तिकिटावर दुबईहून हैदराबादला उड्डाण केले, तिने त्याच्या खात्यात पाठवलेल्या पैशांचा वापर केल्याचं समोर आलंय.
अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांच्याकडे याचे पुरावे आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राण्या राव 2023 ते मार्च 2025 दरम्यान दुबईला 52 वेळा गेली होती. त्यापैकी किमान 26 वेळा राजू तिच्यासोबत होता. त्यांना संशय आहे की, याच दिवशी परतीच्या प्रवासाचा वापर भारतात सोने तस्करी करण्यासाठी करण्यात आला होता.
राजूविरुद्ध परिपत्रक नोटीस जारी झाल्यानंतर, त्याने त्याच्या अटकेसाठी कायदेशीर कारणांसह सर्व आवश्यक कागदपत्रे न्यायालयात जोडून देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. सत्र न्यायालयात राण्य रावचा जामीन अर्ज 19 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आला आहे. सीसीएच 64 व्या सत्र न्यायालयाने आज डीआरआयच्या वकिलांना पुढील सुनावणी 19 मार्चपर्यंत आपले आक्षेप दाखल करण्याचे निर्देश दिले.
आक्षेप दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू राहणार आहेत. राण्या रावने यापूर्वी आर्थिक गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, जो तिच्यावरील गंभीर आरोपांमुळे फेटाळण्यात आला होता. डीजीपी दर्जाचे अधिकारी आयपीएस के रामचंद्र राव राण्या रावचे सावत्र वडील देखील आहेत, त्यांची त्यांच्या सावत्र मुलीशी संबंधित सोने तस्करी प्रकरणात सोमवारी चौकशी करण्यात आली.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने त्यांचा जबाब नोंदवला. डीआरआय अधिकाऱ्यांनी सोने घेऊन जाताना राण्या रावला 3 मार्च 2025 रोजी बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली होती. डीआरआयचे अतिरिक्त संचालक अभिषेक चंद्र गुप्ता यांच्या तक्रारीवरून सीबीआयने सोने तस्करी प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे.