Gold Smuggling : हवालाच्या पैशाने सोने खरेदी केलं, रान्या रावची मोठी कबुली

Ranya Rao Buying Gold With Hawala Money : दुबई सोने तस्करी प्रकरणात मोठी अपडेट आहे. सोने तस्करी प्रकरणी (Gold Smuggling) 3 मार्च रोजी कन्नड अभिनेत्री रान्या रावला (Ranya Rao) बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आलेली होती. तिला 14.8 किलो सोन्यासह पकडलं गेलं होतं. सोने खरेदी करण्यासाठी हवालाचा (Hawala Money) वापर केला होता, अशी कबुली रान्या रावने दिली आहे. रान्या रावचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात आलाय. तिच्या अडचणींत वाढ झाल्याची माहिती मिळतेय.
बांधकाम कामगारांना गुडन्यूज! 12 हजार रुपये पेन्शन मिळणार; कामगार मंत्री फुंडकरांची घोषणा
जामिनाच्या सुनावणीदरम्यान सोने खरेदी करण्यासाठी हवालाद्वारे पैसे ट्रान्सफर केल्याची कबुली दिलीय. तसेच, रान्या रावच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने 27 मार्चपर्यंत निर्णय राखून ठेवला (Ranya Rao News) आहे. या प्रकरणात, रान्या रावचा जामीन अर्ज आता दोनदा फेटाळण्यात आला आहे. पहिल्यांदाच, ट्रायल कोर्टाने आणि दुसऱ्यांदा आर्थिक गुन्हे प्रकरणांसाठी असलेल्या विशेष कोर्टाने तिला जामीन देण्यास नकार दिला होता.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) वतीने न्यायालयात उपस्थित असलेल्या वकील मधु राव यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय की, आरोपीने अनौपचारिक मार्गाने आर्थिक व्यवहार केल्याचे कबूल केलं. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू करण्यासाठी कलम 108 अंतर्गत नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की, ही कार्यवाही न्यायालयीन चौकशीचा भाग होती, पोलीस चौकशीचा नाही. या तपासाचा उद्देश आर्थिक अनियमिततेचं प्रमाण आणि कायद्याचं कोणतंही संभाव्य उल्लंघन शोधणं आहे.
ईद मुबारक! मुस्लिम बांधवांना भाजपकडून ‘सौगत-ए-मोदी’, जाणून घ्या सविस्तर
रान्या रावच्या जामीन अर्जावर 27 मार्च रोजी निर्णय होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रान्याच्या जामीन अर्जावरील चर्चा पूर्ण झालीय. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 27 मार्चपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. अभिनेत्री रान्या रावला बेंगळुरूतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती, जिथे अधिकाऱ्यांनी तिच्याकडून 12.56 कोटी रुपयांचे सोन्याचे बिस्कीट जप्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर, त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला, तेव्हा 2.06 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांचे चलन जप्त करण्यात आलंय.