ईद मुबारक! मुस्लिम बांधवांना भाजपकडून ‘सौगत-ए-मोदी’, जाणून घ्या सविस्तर

BJP Distributes 32 Lakh Saugat A Modi Kits On Ramadan Eid : ईदच्या निमित्तानं (Ramadan Eid) भाजपने एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. ईदच्या निमित्ताने भाजप (BJP) देशभरातील मुस्लिमांना एक मोठी भेट देतंय. भाजप म्हणजेच भारतीय जनता पक्षाने ईदनिमित्त देशभरातील 32 लाख मुस्लिमांना ‘सौगत-ए-मोदी’ (Saugat A Modi) किट देण्याची घोषणा केलीय. ही मोहीम भाजप अल्पसंख्याक आघाडी चालवणार आहे, याअंतर्गत 32 हजार पक्षाचे पदाधिकारी 32 हजार मशिदींशी संपर्क साधतील. या उपक्रमाचा उद्देश गरीब मुस्लिम कुटुंबांना ईद साजरी करण्यास मदत करणे आहे.
‘सौगात-ए-मोदी’ किट काय आहे आणि त्यात काय असेल? असा प्रश्न सर्वांना पडतोय. तर ‘सौगात-ए-मोदी’ किट ही मुस्लिमांसाठी ईदची भेट आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या मुस्लिम बांधवांना देखील ईद चांगल्या प्रकारे साजरी करता यावी म्हणून, भाजप त्यांना ईद साजरी करण्यासाठी हे किट (PM Modi) देत आहे. त्यात गरीब मुस्लिमांना ईद साजरी करता येईल, अशा आवश्यक वस्तू आहेत.
सौगात-ए-मोदी किटमध्ये काय आहे?
‘सौगात-ए-मोदी’ किटमध्ये ईदसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. या किटमध्ये शेवया, खजूर, सुकामेवा, बेसन, तूप-दालदा आणि महिलांसाठी सूट फॅब्रिक देखील आहे. याशिवाय, किटमध्ये उत्सवादरम्यान उपयुक्त ठरणाऱ्या इतर काही आवश्यक वस्तू देखील असू शकतात. भाजपने म्हटलंय की, ही योजना केवळ मदतच करणार नाही तर मुस्लिम समुदायाला काही खास लोकांच्या प्रभावातून बाहेर पडण्यास मदत करणार आहे.
भाजपची ही मोहीम आजपासून सुरू होत आहे. ही नवी दिल्लीतील गालिब अकादमीपासून सुरू होणार आहे. याअंतर्गत, प्रत्येक भाजप कार्यकर्ता 100 लोकांशी संपर्क साधणार आहे. भाजपचा दावा आहे की, हे पाऊल सामाजिक समावेशन आणि गरिबी निर्मूलनाच्या दिशेने एक मोठे प्रयत्न आहे. हा उपक्रम बिहारसह अनेक राज्यांमध्ये राबविला जाणार असल्याची माहिती मिळतेय.
देशभरात एकीकडे रमजान ईदचा उत्साह आहे, तर दुसरीकडे राज्यात गुढी पाडव्याच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळतेय. गुढी पाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही उत्सव एकापाठोपाठ एक आलेत. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम बांधव आपापल्या सणाच्या तयारीला लागले आहेत. यातच भाजपने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्ताने ईदी भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतलाय.