‘महाराष्ट्रात एक नेपाळी फिरतोय…तोच हिंदू धर्म वाचवू शकतो’ अनिल परबांचा हल्लाबोल, ठाकरे मिश्कीलपणे हसले

Anil Parab Called Nepali To Nitesh Rane On Hindutwa : विधान परिषदेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय. त्यांना वाटतं मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असा खोचक टोला परबांनी राणेंना लगावला आहे. तर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची अन् जाती जातींमध्ये भांडणं लावायचे, असा प्रयत्न राज्यात केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील अनिल परब यांच्या बाजूला उपस्थित होते. मात्र अनिल परब बोलत असताना उद्धव ठाकरे मात्र तोंडाला हात लावून मिश्कीलपणे हसत होते.
मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात एक नेपाळी (Maharashtra Politics) आहे, त्याला वाटतंय की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असा टोला अनिल परब यांनी लगावला. जाती-जातीत आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात केला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. विधान परिषदेत अनिल परब बोलताना त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे उपस्थित होते.
‘करेंगे दंगे चारों ओर पुलिस…,’ कुणाल कामराचं नवं गाणं, स्टुडिओतील राड्यावरून शिवसेनेवर साधला निशाणा
माझ्या सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमन आहे. तो रात्रभर जागते रहो, असं ओरडत असतो. त्याला वाटतं त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. पण तसं नाहीये. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय. त्याला असं वाटतोय, त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला आहे. त्याचा असा समज झालाय. हल्ली काय शाल बील घेवून अशी…असा समज झालाय. अरे त्यांची गरज नाही. हिंदू धर्म सांभाळयाला आम्ही समर्थ आहोत, असं देखील अनिल परब यांनी म्हटलं आहे. परब यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.
परब म्हणाले आमच्यात हिंदू धर्म सांभाळायची ताकद आहे. परंतु माझ्या धर्माने, स्वत:च्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावर जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, अशी शिकवण दिलीय. काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे जातीजातीत तेढ वाढवणं, मागील काळात ज्या काही घटना आहेत, त्या तुम्ही सगळ्या बघा. जाती जातीत तेढ वाढवण्याचं काम केलं जातंय.
दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे आरोपी..मुख्यमंत्री पदाचा गैरवापर, दिशाच्या वडिलांचा खळबळजनक आरोप
ज्या घटनेने मला अधिकार दिले आहेत. त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार विरोधक आणि सत्ताधारी दोघांना देखील नाहीये. त्यामध्ये मला कोणाचा हस्तक्षेप मान्य नाही. आपलं राज्य संघराज्य आहे, त्या पद्धतीने चाललंय. राज्याचे अधिकार राज्याकडे आहेत. परंतु सगळं एकमेकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचं काम चाललं आहे, अशी टीका देखील अनिल परब यांनी केलीय.