‘करेंगे दंगे चारों ओर पुलिस…,’ कुणाल कामराचं नवं गाणं, स्टुडिओतील राड्यावरून शिवसेनेवर साधला निशाणा

‘करेंगे दंगे चारों ओर पुलिस…,’ कुणाल कामराचं नवं गाणं, स्टुडिओतील राड्यावरून शिवसेनेवर साधला निशाणा

Stand Up Comedian Kunal Kamra New Video Criticize Shiv Sena : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) केलेल्या गाण्यांवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील टिप्पणीवरून राजकारण तापलंय. कारवाई करत, बीएमसीने इमारतीचे (द हॅबिटॅट) बेकायदेशीर भाग पाडण्यास सुरुवात केली. तिथे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा व्हिडिओ (Kunal Kamra New Video) व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्यात वातावरण तापलं.

कामराच्या व्हिडिओवरून सोमवारी शिवसैनिकांनी (Shiv Sena) द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. आता कामरा यांनी इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर टीका केलीय. कुणालने त्याच्या वकिलामार्फत मुंबई पोलिसांना पत्र पाठवलं, उत्तर देण्यासाठी एका आठवड्याची वेळ मागितली आहे.

मोठी बातमी! आता ट्रक, ट्रॅव्हल्सवर मराठीतच संदेश, परिवहन मंत्र्यांचा आदेश; गुढीपाडव्याचा मुहूर्त..

कुणाल कामराने आता पुन्हा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये कामरा, ‘हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश. होंने नगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम.’ ‘हम होंगे कंगल एक दिन’ या गाण्यासोबत, व्हिडिओमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी द हॅबिटॅटची कशी तोडफोड केली, हे कामराने दाखवले आहे. विकसित भारताचं नवीन राष्ट्रगीत असं म्हणत कामराने हा व्हिडिओ बनवलेला आहे.

‘…तर आम्ही तिथे येवून सगळी’, एफआरपीवरून राजू शेट्टी आक्रमक, सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम

कुणाल कामराच्या व्हिडिओवरून वाद
आज संसदेतही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कुणाल कामरा यांच्या टिप्पणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेना खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांनी कामरा यांचे नाव न घेता हा मुद्दा उपस्थित केला. अशा प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kamra (@kuna_kamra)

बीएमसीचा द हॅबिटॅटवर हातोडा
महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या इमारतीत स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होत, त्या इमारतीचे बेकायदेशीर भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारी, बीएमसीने द हॅबिटॅटच्या टेरेसवरील बेकायदेशीर बांधकाम पाडले. बीएमसीची कारवाई आजही (मंगळवार) सुरूच आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube