‘मी घाबरत नाही, पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रिजवर…’, वादानंतर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया

‘मी घाबरत नाही, पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रिजवर…’, वादानंतर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया

Kunal Kamra Reaction On Eknath Shinde : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गाणं म्हटल्यानंतर राज्यातील राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात कुणाल कामरा याने माफी मागावी, त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सभागृहात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

तर आता वाढत्या वादानंतर कुणाल कामरा याने सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी घाबरत नाही आणि पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रिजवर करणार, मी जो बोललो तेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सांगितले होते अशी प्रतिक्रिया कुणाल कामरा याने सोशल मीडियावर एका निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे.

मी घाबरत नाही : कुणाल कामरा

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या निवेदनात कुणाल कामरा म्हणाला की, माध्यमांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की भारतातील प्रेस स्वातंत्र्य 159 व्या क्रमांकावर आहे. मी या जमावाला घाबरणार नाही आणि मी लपणार नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून हा वाद शांत होण्याची वाट पाहणार नाही. मी पोलिस आणि न्यायालयाला सहकार्य करेन, पण ज्यांनी विनोदाच्या रागातून हॅबिटॅटमध्ये तोडफोड केली त्यांच्या विरोधात देखील कायदा लागू होणार का? असा प्रश्न देखील कुणाल कामरा याने यावेळी उपस्थित केला.

पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रिजवर

मनोरंजन स्थळ हे फक्त एक रंगमंच आहे. हॅबिटॅट (किंवा इतर कोणतेही स्थळ) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही, तसेच मी काय बोलतो किंवा करतो यावर त्याचे कोणतेही नियंत्रण नाही. एखाद्या विनोदी कलाकाराच्या शब्दांसाठी एखाद्या स्थळावर हल्ला करणारा राजकीय पक्ष टोमॅटो वाहून नेणारा ट्रक उलटवण्याइतकाच हास्यास्पद आहे कारण तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही. कदाचित माझ्या पुढच्या शोसाठी मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील इतर कोणताही स्थळ निवडेन जो लवकर पाडण्याची गरज आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार केवळ श्रीमंतांची खुशामत करण्यासाठी नाही

मला धडा शिकवण्याची धमकी देणाऱ्या राजकीय नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार केवळ शक्तिशाली आणि श्रीमंतांची खुशामत करण्यासाठी नाही. एखाद्या शक्तिशाली सार्वजनिक व्यक्तीची थट्टा केल्याने माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही. माझ्या माहितीनुसार, आपल्या नेत्यांबद्दल आणि आपल्या राजकीय सर्कसबद्दल विनोद करणे बेकायदेशीर नाही. असं देखील कामरा म्हणाला.

खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तर दुसरीकडे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी खार पोलिस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या विरोधात राज्यातील अनेक भागात आंदोलने करत कामरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गुढी ठेवण्यासाठी कोणती दिशा शुभ? मुहूर्त, वेळ जाणून घ्या सविस्तर…

तर फोनवरुन कुणाल कामरा याने माहितीनुसार, मुंबई पोलिसांशी संपर्क साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंबद्दल जे म्हटले होते तेच मी म्हटले होते. असं म्हणत माफी मागण्यास नकार दिला आहे तसेच या प्रकरणात पोलिसांना तपासात मदत करण्याते आश्वासन दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube