‘…तरच माफी मागेन’, कुणाल कामराने पोलिसांसमोर ठेवली मोठी अट

‘…तरच माफी मागेन’, कुणाल कामराने पोलिसांसमोर ठेवली मोठी अट

Kunal Kamra Statement Apologize After Court Orders : ‘स्टँड-अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरूद्ध बदनामीकारक गाणं बनवलं, असा आरोप केला जातोय. कुणाल कामराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं होतं. या व्हिडिओनंतर आक्रमक होत शिवसैनिकांनी कामराने कार्यक्रम घेतलेल्या स्टुडिओची देखील तोडफोड केल्याचं समोर येतंय. तर कामराने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी होत आहे. यावर आता कुणाल कामराची (Kunal Kamra) प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक, कोल्हापूर पोलिसांची कारवाई

कुणाल कामराने मुंबई पोलिसांना सांगितलं की, त्याला त्याच्या ‘गद्दार’ किंवा ‘देशद्रोही’ वक्तव्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. न्यायालयाने माफी मागायला सांगितली, तरच तो माफी मागेल असे त्याने म्हटले आहे. पोलीस सूत्रांनी पुढे सांगितलं (Kunal Kamra Video) की, कामरा यांनी तामिळनाडूतील पोलिसांशी बोलताना शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांनी पैसे दिल्याच्या अफवांचे खंडन केलंय. कामराने पोलिसांना सांगितलं की, ते त्याचे खाते तपासून पाहू शकतात की त्याला पैसे मिळाले आहेत की नाही.

कामरा आणि 40 शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी सोमवारी ‘स्टँड-अप कॉमेडियन’ कुणाल कामरा यांच्याविरुद्ध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कथितपणे अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर दाखल केली होती. मुंबईतील खार परिसरात असलेल्या ‘हॅबिटॅट स्टुडिओ’ची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 40 शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Video : कॉमेडियन कुणाल कामराने कार्यक्रम घेतलेला स्टुडिओ जमीनदोस्त?, अधिकारी ॲक्शन मोडवर

रविवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार भागातील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केल्याचा आरोप आहे, तिथे कामराचा शो चित्रित करण्यात आला होता. कार्यक्रमात कामरा यांनी “गद्दार” हा शब्द वापरून एकनाथ शिंदेंवर टीका केली, असा आरोप कार्यकर्ते करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने व्यंगात्मक भाष्य केलंय. मात्र, त्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. कामराने एका विडंबनात्मक गाण्यातून कामराने शिंदेंच्या बंडावर निशाणा साधला. हे करताना त्यानं गद्दार असाही उल्लेख केला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील कामरा यानं सोशल मीडियावर शेअर केला होता.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube