Video : कॉमेडियन कुणाल कामराने कार्यक्रम घेतलेला स्टुडिओ जमीनदोस्त?, अधिकारी ॲक्शन मोडवर

Video : कॉमेडियन कुणाल कामराने कार्यक्रम घेतलेला स्टुडिओ जमीनदोस्त?, अधिकारी ॲक्शन मोडवर

Kunal Kamra Comment on DCM Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने व्यंगात्मक भाष्य केलं. मात्र, त्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. कामराने एका विडंबनात्मक गाण्यातून त्यानं (Shinde) शिंदेंच्या बंडावर निशाणा साधला. हे करताना त्यानं गद्दार असाही त्यांचा उल्लेख केला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील कामरा यानं सोशल मीडियावर शेअर केला.

कुणाल कामरा अन् शिंदेंच्या वादात जया बच्चन यांची उडी; बाळासाहेबांचं नाव घेत शिंदेंना सुनावलं

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी ज्या स्टुडिओत हा कार्यक्रम झाला त्या स्टुडिओची अर्थात युनीकॉन्टिनेंटल स्टुडिओची तोडफोड केली. या घटनेनंतर तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर खार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसंच कुणाल कामरा याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आता युनीकॉन्टिनेंटल स्टुडिओवर बुलडोझर कारवाई होण्याची शत्यात वर्तवली जात आहे. कारण या स्टुडिओचं अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगितलं जात आहे. या स्टुडिओच्या आवारात सध्या पोलीस महापालिका आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी पोहचले आहेत.

पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या १२ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामध्ये राहुल कनाल यांचाही समावेश आहे. राहुल कनाल यांच्यासह इतर ११ जणांना काही वेळापूर्वी वांद्रे न्यायालयासमोर हजर केलं. वांद्रे पोलिसांनी राहुल कनाल, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर, गोविंद पाडी, राहुल तुर्बडकर, विलास चावरी, अमीन शेख, समीर महापदी, हिमांशू, शशांक कोडे, संदीप मळप, गणेश राणे, शोभा पालवे, कृष्णा ठाकूर, पवनज्योत सेठी, कल्पेश, कुरेशी हुजेफ आणि चांद शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतर १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube