कुणाल कामरा अन् शिंदेंच्या वादात जया बच्चन यांची उडी; बाळासाहेबांचं नाव घेत शिंदेंना सुनावलं

कुणाल कामरा अन् शिंदेंच्या वादात जया बच्चन यांची उडी; बाळासाहेबांचं नाव घेत शिंदेंना सुनावलं

MP Jaya Bachchan On Kunal Kamra Row : देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? असा प्रश्न समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी विचारात कुणाल कामरा प्रकरणात उडी घेतली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर वादग्रस्त गाणं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून कुणाल कामरावर राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील कुणाल कामरावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सभागृहात दिली आहे. तर आता या प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत खासदार जया बच्चन यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, तुम्ही शिवसेना फोडली तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का? असा प्रश्न देखील खासदार जया बच्चन यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

माध्यमांशी बोलताना पुढे जया बच्चन म्हणाल्या की, जर बोलण्यावर बंधन असेल तर तुमचे (मीडिया) काय होईल? तुमची (मीडिया) तर सध्या परिस्थिती खूप वाईट आहे. तुमच्यावर अनेक बंधने आहे. तुम्हाला आता फक्त या मुद्यावर बोलायला लावणार. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे? असं जया बच्चन म्हणाल्या तसेच जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि सत्तेसाठी नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना विचारला. तर दुसरीकडे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्याचा काम पोलीसाकंडून करण्यात येत आहे.

रिलीजपूर्वीच सिकंदर ‘मालामाल’, परदेशात करणार बंपर कमाई, कसं ते जाणून घ्या

शिवसैनिकांनी तोडफोड

तर या प्रकरणात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून शिवसैनिकांनी कुणाल कामरा याच्या खार येथील सेटवर तोडफोड केली आहे. या प्रकरणात 40 शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube