सोनं चमकलं, शेअर बाजार थंडावला! मागच्या दिवाळीनंतरचा धक्कादायक हिशेब

गेल्या वर्षभरातील गुंतवणुकींच्या दुनियेत सोनं आणि चांदीने अक्षरशः चढता आलेख गाठला आहे.

Gold Or Stock Market Which Generated Most Profits

Gold Or Stock Market Which Generated Most Profits : दिवाळी आता अगदी तोंडावर आली आहे. गेल्या वर्षभरातील गुंतवणुकींच्या दुनियेत सोनं आणि चांदीने अक्षरशः चांदणी केली आहे. मागील दिवाळीपासून आतापर्यंत सोन्याच्या भावात तब्बल 65% वाढ, तर चांदीने तर 71% पर्यंत जबरदस्त रिटर्न दिला आहे. दुसरीकडे, शेअर बाजारातील सेंसेक्स आणि निफ्टी मात्र एक अंकी म्हणजेच फक्त 5 ते 6 % नफा देण्यात मागे पडले आहेत.

गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर समाधान

गेल्या वर्षी म्हणजे 31 ऑक्टोबर 2024 रोजी सोन्याचा (Gold Or Stock Market) भाव 78,430 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर यंदा ऑक्टोबर 2025 मध्ये तो झेपावून थेट 1,29,852 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे. म्हणजे जवळपास 51 हजार रुपयांची झेप! चांदीची (Diwali) कमाईही काही कमी नाही. गेल्या दिवाळीला 97,740 रुपये किलो असलेली चांदी आता 1,67,663 रुपये किलो पर्यंत झेपावली आहे. म्हणजे 70 हजार रुपयांचा वाढीव फायदा आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर समाधानाची चांदणी.

सोनं किंवा चांदीत गुंतवणूक

पण शेअर बाजारात चित्र वेगळं आहे. मागील दिवाळीला सेंसेक्स होता 79,389 अंकांवर, तर आता फक्त 83,952 अंकांवर – म्हणजे फक्त 5.75% नफा. निफ्टीची वाढ तर अजूनच कमी, केवळ 6.21% इतकीच. म्हणजेच, मागील दिवाळीपासून जर कोणी सोनं किंवा चांदीत गुंतवणूक केली असेल, तर त्यांचे बँक बॅलेन्स खरोखर’दुप्पट’ झाले आहेत. पण ज्यांनी शेअर बाजारावर विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी ही दिवाळी थोडी फिकी ठरली आहे.

यंदा मुहूर्त ट्रेडिंग

या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार आता नव्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी उत्सुक आहेत. यंदा मुहूर्त ट्रेडिंगचा दिवस आहे 21 ऑक्टोबर, आणि बाजारपेठा या वेळी कोणता सोनेरी रंग दाखवतात? हे पाहणं रोचक ठरणार आहे.

follow us