Diwali 2023 : भाऊबीजेच्या दिवशी जाणून घ्या यम आणि यमुनेची ‘ही’ अख्यायिका…

Diwali 2023 : भाऊबीजेच्या दिवशी जाणून घ्या यम आणि यमुनेची ‘ही’ अख्यायिका…

Diwali 2023 : दिवाळी (Diwali 2023 ) या पाच दिवसांच्या सणामधील एक दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा भाऊबीज. रक्षाबंधननंतर भाऊबीज हा आणखी एक सण आहे ज्या दिवशी बहिण आपल्या भावाला औक्षण करते. त्याला ओवाळते आणि त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या औक्षणानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो किंवा त्याला ओवाळणी असं देखील म्हटलं जात. मात्र या सणाची सुरूवात कशी झाली. जाणून घेऊ…

या सणाची सुरूवात कशी झाली याबद्दल एक अख्यायिका सांगितली जाते की, मृत्यू देवता यम आणि यमुना नदी हे दोघे बहिण भाऊ आहेत. एक दिवस यम आपल्या या बहिणीकडे गेले होते. त्यावेळी यमुनेने आपल्या भावाला जेऊ खाऊ घातले औक्षण केले. त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा यमराज प्रसन्न झाले त्यांनी तिला वरदान मागण्यास सांगितले.

Diwali 2023 : दिवाळीत भाविकांकडून साईचरणी दान !आंध्रप्रदेशमधील भक्ताकडून मोठी रक्कम

त्यावेळी यमुनेने वरदान मागितले की, तू दरवर्षी असाच माझ्या घरी येत जा. तसेच ज्याप्रमाणे मी माझ्या भावाला औक्षण केलं. तसचं जी बहिण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला देखील घाबरणार नाही. तसेच त्या वर्षी मृत्यूपासून तिच्या भावाचं संरक्षण होईल. तो दिवस होता दिवाळीतील पाडव्याचा दुसरा दिवस म्हणजे द्वितीया म्हणून या सणाला भाऊबीज किंवा यमद्वितीया असं म्हटलं जात. त्यामुळे या दिवशी यमुना नदीमध्ये स्नान करण्याचं देखील विशेष महत्त्व आहे. जे असं स्नान करतात त्यांचं देखील मृत्यूपासून संरक्षण होतं. असं मानलं जात.

संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बहिणी भावासाठी या दिवशी उपवास देखील करतात. तर अगोदर चंद्राला औक्षण करूननंतर आपल्या भावाला औक्षण करतात. दरम्यान या सणाला भाऊ बहिण काही कारणांनी भेटू शकले नाही तर पौर्णिमेपर्यंत हा सण चालतो. तोपर्यंत हा भावा बहिणीचा सण साजरा केला जातो.

Diwali 2023 : नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपुजन, पौराणिक महत्त्वासह पुजेचा मुहूर्त जाणून घ्या

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube