Diwali 2023 : दिवाळीत भाविकांकडून साईचरणी दान !आंध्रप्रदेशमधील भक्ताकडून मोठी रक्कम
अहमदनगर: शिर्डीतील साईबाबा (Saibaba)मंदिरात दिपावलीनिमित्त लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे झाले. दिवाळीनिमित्त भक्तांची गर्दी झाली होती. भक्तांकडून दानही देण्यात येत होते. आंध्रप्रदेशमधील देणगीदार साईभक्त श्री.एम. श्रीनिवास राव यांनी मेडिकल फंडासाठी बारा लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
ही देणगी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी स्वीकारली.श्री साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार यांचा श्रींची मूर्ती व श्री साई चरीत्र देऊन सत्कार करण्यात आला. दिपावलीनिमित्त सायंकाळी समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या पत्नी ज्योती हुलवळे यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कूबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम झाले.
सगळा बालिशपणा! शरद पवारांचा कुणबी दाखला अन् OBC दाव्याला सुप्रिया सुळेंनी फटकारलं
याप्रसंगी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, मालती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, लेखाधिकारी कैलास खराडे,मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मी-कूबेर पूजन झाल्यानंतर श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरु करण्यात आली.
फटाका मार्केटला भीषण आग; 15 हून अधिक जण जखमी, 4 जणांची प्रकृती चिंताजनक
दिपावली उत्सवानिमित्त भुवनेश्वर येथील साईभक्त सदाशिव दास यांच्या वतीने देणगीस्वरुपात विद्युत रोषणाई व आंध्र प्रदेश येथील देणगीदार साईभक्त श्रीमती. पी. श्रीशक्ती यांच्या देणगीतून साईबाबा समाधी मंदिरात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.तसेच आंध्रप्रदेश येथील देणगीदार साईभक्त श्री.एम. श्रीनिवास राव यांनी मेडीकल फंडासाठी १२ लाख रुपये देणगी दिली.