Shirdi Saibaba : शिर्डीकरांच्या विरोधाला यश; साईबाबा समाधी मंदिराची सुरक्षेसाठी सीआयएफ नियुक्तीचा निर्णय मागे

Shirdi Saibaba : शिर्डीकरांच्या विरोधाला यश; साईबाबा समाधी मंदिराची सुरक्षेसाठी सीआयएफ नियुक्तीचा निर्णय मागे

Shirdi Saibaba News : जगविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमधून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिराच्या सुरक्षेसाठी आता महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) तैनात करण्यात आले आहे. दरम्यान शिर्डीकरांच्या विरोधामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएफ) च्या नियुक्तीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या सुरक्षेसाठी शनिवारी ‘एमएसएफ’ची पहिली तुकडी शिर्डीत दाखल झाली आहे. (Shirdi Saibaba Mandir Security will on MFS )

Samruddhi Accident : मृतांची ओळख पटवण्यात अडचणी, सामूहिक अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय

दरम्यान शिर्डी येथे दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. देश विदेशातून भाविक हे शिर्डीत येत असतात. दरम्यान भाविकांची वाढती वर्दळ तसेच शिर्डीच्या साईबांबाच्या मंदिराची सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. साई मंदिराला अनेकदा धमक्या आल्याने भाविकांसह शिर्डीकरांनी मंदिराला चांगली सुरक्षा असावी, अशी मागणी केली होती.

LetsUpp Special : पवारांची विनंती अन् मोदींचा पुणे दौऱ्याला होकार

दरम्यान याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेताना कोर्टाने सरकारला सुरक्षेसंबंधी काळजी घेण्याचे निर्देश दिले. साई समाधी मंदिराच्य सुरक्षेसाठी सरकारकडून केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दल तैनात करणार असल्याचे सांगितले होते.

मात्र सरकारच्या या निर्णयावर ग्रामस्थांकडून आक्षेप घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाला गावकऱ्यांकडून विरोध केला जाऊ लागला. या सुरक्षा व्यवस्थेची कार्यपद्धती पाहता त्यांचा भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांनाही त्रास होईल. त्याचा या तीर्थक्षेत्रावर विपरित परिणाम होईल, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.

यामुळे गावकऱ्यांपुढे नमते घेत सरकारने आपला निर्णय अखेर बदलला. आता सीआयएफ ऐवजी साईबाबा समाधी मंदिराची सुरक्षासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. साई मंदिराला यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा होती. त्यांची जागा आता ही नवी सुरक्षा व्यवस्था घेणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube