Samruddhi Accident : मृतांची ओळख पटवण्यात अडचणी, सामूहिक अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय

Samruddhi Accident : मृतांची ओळख पटवण्यात अडचणी, सामूहिक अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय

Samruddhi Road Vidarbha Travel Accident :बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (terrible accident of travels झाला. अपघातानंतर बसचा स्फोट झाला आणि या यात 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. यामध्ये वर्ध्यातील 14 जणांचा सहभाग होता. या सर्वांवर रविवारी बुलढाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (samruddhi road travels accident bodies does not identified mass cremation on the dead )

या अपघाताची माहिती मिळताच ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नातेवाईक आधीच बुलढाणा येथे पोहोचले आहेत. दरम्यान, वर्धा जिल्हा प्रशासनाची दोन पथके आणि पोलिसांची दोन पथके बुलढाण्यात दाखल झाली आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे नावं कळली असली तरी, मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड आहे. कोणता मृतदेह कुणाचा आहे, हे ओळखणं अवघड झालं आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी ही माहिती दिली आहे.

युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट कंत्राटदारांकडूनच; आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका 

अपघात कसा झाला?

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला.
नागपूरहून पुण्याकडे येणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. काहींनी वेळीच बसमधून बाहेर पडून त्यांचे प्राण वाचवले. या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, ही दुर्घटना बसचा टायर फुटल्यानं झाली नसून हा अपघात बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानं झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागाने दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube