सगळा बालिशपणा! शरद पवारांचा कुणबी दाखला अन् OBC दाव्याला सुप्रिया सुळेंनी फटकारलं
पुणे : “कोणीही त्या कंपनीचे नाव पाहिलेले नाही. इंग्रजीत तो दाखला आहे. शरद पवार दहावीला होते, तेव्हा इंग्रजी प्रमाणपत्र दिले जात नव्हते. हे सगळे हास्यास्पद चालू आहे. सगळा बालिशपणा सुरु आहे. खोटी प्रमाणपत्र मार्केटमध्ये खूप मोठे झाले आहे, असा टोला लगावत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कुणबी प्रमाणपत्र घेत ओबीसी आरक्षण घेतले असल्याच्या दाव्याला फटकारलं. त्या बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. (NCP MP Supriya Sule slammed claim of NCP president Sharad Pawar gets OBC reservation by obtaining Kunbi certificate)
शरद पवार ओबीसी :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मराठ्यांचे नाही तर ओबीसींचे नेते आहेत, तेच मराठा आरक्षणचे मारेकरी आहेत, असा आरोप राजमाता जिजाऊंचे 14 वे वंशज आणि लेखक नामदेव जाधव यांनी केला होता. सोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ मागील काही दिवसांपासून शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला आणि निवडणूक प्रमाणपत्र व्हायरल केले जात होते. यातही शरद पवार यांच्या नावापुढे ओबीसी संवर्ग असल्याच दाखवत ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शरद पवार मराठाच! थेट पुरावा दाखवत ‘OBC’ असल्याचा दावा समर्थकांनी खोडला
विकास पालसकरांनी खोडला दावा :
शरद पवार यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप आणि ओबीसी असल्याचा दावा शरद पवार यांच्या समर्थकांनी खोडून काढला. विकास पालसकर यांनी व्हायरल होणारा जातीचा दाखला खोटा असल्याचे सांगत पवार यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत सर्व अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसेच शरद पवार यांनी कधीही ओबीसी प्रमाणपत्र घेतले नसल्याचा दावाही पालसकर यांनी केला.
प्राध्यापकाला UPSC चा ध्यास, अपयशानंतर अंगावर थेट वर्दी; IPS संदीप गिल यांचा प्रेरणादायी प्रवास
यावेळी ते म्हणाले, शरद पवार यांचे बारामतीत शिक्षण झाले, एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जाते. या षडयंत्रकारी लोकांना कोणी तरी रसद पुरवत असते. सामाजिक विषय येतो तेव्हा खोलात जाऊन शोधावे लागते. त्यामुळे पवार साहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर काय लिहिल ते तुम्हीच पाहा. पवार मराठा असल्याचा धडधडती पुरावा आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांला बदनाम करण्याचं व्हिटॅमिन कुठून येते? नागपूर सेंटरकडूनच हे व्हिटॅमिन पुरवले जात असावे असा आरोपही यावेळी पासलकर यांनी केला आहे.