बांधवगड येथे ‘श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटर’चे भूमिपूजन, वन्यजीव संरक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून भरीव योगदान

वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वन कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रुपकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 15T144701.664

Significant contribution from ‘Puneet Balan Group’ towards wildlife conservation : बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील ताला येथे ‘श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटर’चा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. ‘पुनीत बालन ग्रुप’च्या सहकार्याने या केंद्राची उभारणी करण्यात येत असून, वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वन कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रुपकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. या भूमिपूजन सोहळ्याला आमदार मीना सिंह, पुनीत बालन, त्यांच्या सुविद्य पत्नी आणि माणिकचंद ऑक्सिरिचच्या सीएमडी जान्हवी धारिवाल-बालन, श्रीमती शोभा धारिवाल यांच्यासह वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (विकास शाखा) बी. एस. अन्निगिरी, बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. अनुपम सहाय, उपसंचालक योहान कटारा, सहायक संचालक, ताला परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय रिसॉर्ट असोसिएशन, गाइड असोसिएशन आणि जिप्सी असोसिएशनच्या प्रतिनिधींनीही या सोहळ्यात सहभाग घेतला.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून 2021 पासून गेल्या पाच वर्षांपासून बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील वन कर्मचारी आणि संबंधित घटकांच्या कल्याणासाठी सातत्याने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले जात आहे. या अंतर्गत व्याघ्र प्रकल्पातील सुमारे 1,100 वन कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, गाइड तसेच जिप्सी असोसिएशनचे सदस्य आणि चालकांचा जीवन विमा उतरवण्यात आला आहे. या विम्याचा वार्षिक सुमारे 34 लाख रुपयांचा प्रीमियम ‘पुनीत बालन ग्रुप’कडून भरला जात असून, आगामी दहा वर्षे ही जबाबदारी पार पाडली जाणार आहे. या उपक्रमामुळे वन कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षितता मिळण्यास मदत होत असून, वन्यजीव संरक्षणाचे काम अधिक आत्मविश्वासाने करता येत आहे.

महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट! पहाटे धुक्याची चादर, रात्री गारठा वाढणार, हवामान विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

याशिवाय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांचे संरक्षण आणि गस्त व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुनीत बालन यांच्याकडून तीन इसुझू वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या वाहनांची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही तिन्ही वाहने व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली जाणार आहेत. पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या सहयोगी संस्था या व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. या संस्थांच्या सहकार्याने वन कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कल्याण साधण्याबरोबरच त्यांच्यासाठी सुरक्षित आणि अनुकूल कार्यवातावरण निर्माण करण्यावर बांधवगड व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाचा भर आहे. वन्यजीवांचे संरक्षण, वन कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत पुनीत बालन ग्रुपकडून सुरू असलेले सहकार्य या उपक्रमांच्या माध्यमातून अधिक बळकट होत आहे.

वन्यजीव आणि निसर्गाचे संवर्धन ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून, ती आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे वन कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी हे या संवर्धन कार्याचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कामाला सुरक्षिततेचं बळ मिळावं, त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि वन्यजीव संरक्षणाचं कार्य अधिक सक्षम व्हावं, या उद्देशाने ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून यात योगदान देण्याची संधी आम्हाला मिळाली याचा विशेष आनंद आहे. भविष्यातही आमचं सहकार्य असंच सुरू राहील. असं वक्तव्य यावेळी पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले.

आधीच महागाईने हैराण, त्यात सीएनजी दरवाढीचा आणखी एक झटका! मुंबईत प्रतिकिलो दर 91.50 रुपयांवर

त्यानंतर बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. अनुपम सहाय यांनी पुनीत बालन ग्रुपने केलेल्या कायाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. वन कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी हे वन्यजीव आणि नैसर्गिक संपदेचे संरक्षण करण्याचं काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र करत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी जीवन विम्याची सुविधा, तसेच वन्यजीव संरक्षण आणि गस्त व्यवस्थेसाठी वाहनांची उपलब्धता करून देण्याचा पुनीत बालन ग्रुपचा उपक्रम निश्चितच मोलाचा आहे. अशा सहकार्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासोबतच वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळते. बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन कार्यात पुनीत बालन ग्रुपने गेल्या पाच वर्षांपासून दिलेले सातत्यपूर्ण योगदान कौतुकास्पद असून, त्यांचे मनापासून आभार!

follow us