Diwali 2023 : नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपुजन, पौराणिक महत्त्वासह पुजेचा मुहूर्त जाणून घ्या
Diwali 2023 : दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. खरचं दिवाळी आली की, लहान थोरांपासून दिवाळीचं अप्रुप सर्वांनाच असतं. नवनवीन कपडे, फराळ, फटाके आणि अभ्यंग स्नान सगळीच रेलचेल असते. तसा दिवाळी सण पाच ते सहा दिवसांचा असतो. मात्र तिथींच्या मागे पुढे होण्यामुळे यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपुजन एकाच दिवशी आहे.
Uddhav Thackeray : ‘हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवून आम्हाला भिडा’; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान
त्यामुळे सुरूवातीला पाहुयात नरकचतुर्दशीचं महत्त्व काय आहे?
नरकचतुर्दशीचं पौराणिक महत्त्व सांगायचं म्हणजे द्वापार यगुमध्ये या कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तेव्हापासून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी यमराज, काली माता आणि श्रीकृष्णाची म्हणजेच भगवान विष्णूंची खास वामन स्वरूपाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. तर यावर्षी नरक चतुर्दशी शनिवारी 11 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी सुरू झाली पण ती 12 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे ती रविवारीच साजरी केली जाणार आहे. कारण सुर्याने पाहिलेली तिथी मानली जाते.
Naresh Mhaske : ‘राऊतांनाच CM व्हायचं होतं, बैठकाही घेतल्या’; म्हस्केंचा दावा
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस ‘लक्ष्मीपुजन’
आता पाहूयात लक्ष्मीपुजन दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपुजन. या दिवशी अमावस्या असते. एरव्ही शुभकार्यासाठी अमावस्या वर्ज्य मानली जाते. मात्र दिवाळीच्या अमावस्येला खास महत्त्व आहे. सतयुगात, देवी लक्ष्मी प्रथम कार्तिक महिन्याच्या अमावस्येला समुद्रमंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा आहे. त्याचबरोबर या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती. याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे. पुढे त्रेतायुगातील या दिवशी राम वनवासातून घरी परतले तो दिवस देखील लक्ष्मीपुजनाचाच होता.
या दिवशी देखील अभ्यंग स्नाने दिवसाची सुरूवात होते. त्यानंतर फराळाचा आस्वाद घेतला जातो. तर संध्याकाळी घर आणि अंगणात सडा समार्जन करून आयुष्यातील अंधार दूर करण्याचं एक प्रतिक म्हणून सर्वत्र दिवे लावले जातात. लक्ष्मीपुजन केलं जात. यामध्ये गणपतीसह लक्ष्मीच्या पुजनाचं विशेष महत्त्व असतं. अशा प्रकारे घर आणि आयुष्यात अखंड लक्ष्मीसह सुख-समृद्धी टिकून रहावी यासाठी कामना केली जाते. त्यामुळे या दिपोत्सवामध्ये तुमचं सर्वांचं आयुष्य देखील दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघून दे… सुख समृद्धी आणि भरभराट होऊ दे अशा लेट्स मराठीकडून सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!