राज्यातील दीड कोटी एकर शेतीचे नुकसान; सरसकट कर्जमाफी देणार का ? कृषिमंत्र्यांचे थेट उत्तर
Dattatray Bharne: सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.

Dattatray Bharne: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे (Farmer)अतोनात नुकसान झाले आहे. सरकारकडून मदतही जाहीर करण्यात आली आहे. आता राज्यातील शेतीच्या नुकसानाचीचा प्राथमिक अंदाज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी सांगितला आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात सर्वात अधिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. त्यात राज्यातील 33 जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. त्यात सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज दत्तात्रय भरणे यांचा आहे. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.
सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यांमध्ये ?
राज्यात मे महिन्यापासून अतिवृष्टी सुरू आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. त्याचा फटका 33 जिल्ह्यांना बसला आहे. नांदेड, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना, यवतमाळ, धाराशिव या जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला आहे. राज्यातील सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. जमीन वाहून गेली आहे. घरे वाहून गेली आहेत. नुकसान मोठे आहे. शेतीच्या नुकसानाची पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहे. साधारण दीड कोटी एकर शेतीचे नुकसान आहे. त्यात एक कोटी एक लाख एकर शेतीचे सप्टेंबर महिन्यात नुकसान झाले आहेत. (1.5 crore acres of agriculture damaged in the state; Will a general loan waiver be given)
दहा दिवसांत पंचनामे, दिवाळीपूर्वी मदत
राज्य सरकारकडून 2250 कोटी रुपयांची मदत देण्यात येत आहे. ती मदत वाटप सुरू आहे. सप्टेंबर महिन्यातील नुकसान मोठे झाले आहे. पंचनामे झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत दिवाळीपूर्वी सर्वांचा मदत निश्चित दिली जाईल. जिल्हाधिकारी स्तरावर शेतकऱ्यांना दहा हजार रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहे. जनावरांना चारा, अन्न धान्य दिले जात असल्याची दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
सरसकट कर्जमाफीवर काय म्हणाले ?
कर्जमाफी करण्याबाबत कुणाचे दुमत नाही. सगळेच सकारत्मक आहे. अतिवृष्टीकाळात शेतकऱ्यांना पहिले उभे करायचे आहे. शेतकरी पुन्हा कसा उभा राहिल, यासाठी मदत दिले जाणार आहे. कर्जमाफी निश्चितपणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. आताची शेतकऱ्यांना करण्यात येणारी मदत अपुरीच आहे. परंतु केंद्र सरकारकडून निकषात बदल करून जास्तीत जास्त मदत घेऊन ती शेतकऱ्यांना दिली जाईल, असे भरणे म्हणाले.