Gold Rate : सोन्याचे भाव गगनाला भिडले! 6 हजारांनी भाव वाढले, लाखाच्या घराकडे वाटचाल…

Gold Rate : सोन्याचे भाव गगनाला भिडले! 6 हजारांनी भाव वाढले, लाखाच्या घराकडे वाटचाल…

Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Rate) चांगलीच वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतलीयं. 11 एप्रिल रोजी वायदा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 6,800 रुपयांनी वाढले आहेत.

API Ashwini Bidre Murder : PI अभय कुरुंदकरची शिक्षा लांबणीवर! पुढची सुनावणी कधी?

लग्नसराईच्या सीझनमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होत असून दिल्लीत सोन्याच्य दरात तब्बल 6250 रुपयांची वाढ झाली अूसन दिल्लीत 24 कॅरट सोन्याचे दर प्रतितोळा 96,450 रुपयांवर पोहोचले आहेत. अखिल भारतीय सराफा बाजार संघाकडून याबाबत माहिती देण्यात आलींय.

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापाराचं युद्ध असंच सुरुच राहिलं तर लवकरच सोन्याचे दर प्रतितोळा लाख रुपयांवर पोहोचतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलायं.

रोहित शर्माच्या जागी कोण? गौतम गंभीरला सापडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, निवड होणार?

आज सोन्याच्या दरात अचानक प्रति तोळ्यामध्ये तब्बल 6,250 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 90,200 रुपये एवढे होते आज ते 96,450 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ सुरूच आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ ब्रेक मागे वेगळाच प्लॅन; चीनवर दबाव अन् जगभरात बिजनेस डील..

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रात देखील सोन्यानं पहिल्यांदाच 95 हजारांचा आकडा पार केला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 95 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे तब्बल तीन हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. काल सोन्याच्या दरात २३०० रुपयांची तर आज पुन्हा ११०० रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube