रोहित शर्माच्या जागी कोण? गौतम गंभीरला सापडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, निवड होणार?

रोहित शर्माच्या जागी कोण? गौतम गंभीरला सापडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, निवड होणार?

Rohit Sharma : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या (Rohit Sharma) चर्चा सुरू आहेत. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजांना धडकी भरवणारा फलंदाज म्हणून रोहित ओळखला जातो. आता रोहित 38 वर्षांचा झाला आहे. त्यातच कसोटीत त्याचा खराब फॉर्म अजूनही सुरुच आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याची बॅट शांतच होती. मग आता रोहित शर्माच्या जागी कोण? कोच गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहितच्या जागी नवा खेळाडू मिळाला का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

रोहित शर्माला पर्याय म्हणून एका खेळाडूचं नाव समोर आलं आहे. साई सुदर्शन हा रोहितचा (Sai Sudarshan) पर्याय ठरू शकतो असे सांगितले जात आहे. सुदर्शन तांत्रिकदृष्ट्या चांगला खेळाडू आहे. जून महिन्यात टीम इंडिया इंग्लंडमध्ये (Team India) पाच कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेत साई सुदर्शन दिसू शकतो.

साई सुदर्शनने मागील वर्षात काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्याने पहिल्या सीजनमध्ये सर्रेकडून खेळताना शतक केले होते. 178 चेंडूत त्याने 10 चौकार आणि 1 षटकार खेचत 105 धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर साई सुदर्शन लाँग फॉर्मेटमध्ये खेळू शकतो हेही अधोरेखित झाले.

तु निवृत्ती घेण्याच्या चर्चा आहेत?, जे काही सुरु आहे त्या अफवांना हवा.. रोहित शर्माचं एका वाक्यात उत्तर

माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाच्या मते रोहित शर्मानंतर यशस्वी जयस्वालबरोबर साई सुदर्शन डावाची सुरुवात करू शकतो. साई सुदर्शनची फलंदाजी पाहता भविष्य त्याच्यासाठी चांगले आहे असे वाटते. त्याला जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे तो चांगले प्रदर्शन करील. आयपीएलमध्येही सुदर्शन चांगले प्रदर्शन करत आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही सुदर्शनने चांगल्या धावा केल्या. साई सुदर्शन आता 23 वर्षांचाच आहे. जर त्याला संधी मिळाली तर तो दीर्घ काळ कसोटी सामने खेळू शकतो. या सिजनमध्ये साई सुदर्शन वेगाने धावा करत आहे. इतकेच नाही तर त्याची फलंदाजीची शैली सुद्धा रोहित शर्मासारखीच वाटते असे आकाश चोपडाने सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा अपयशी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (Australia) रोहित शर्मा अपयशी ठरला होता. मागील आठ कसोटी सामन्यांत रोहितची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. बांग्लादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर रोहितला धावा करताना मोठा संघर्ष करावा लागत होता. यावर्षी इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये होता. परंतु, नंतर मात्र त्याची फलंदाची ढेपाळली.

Rohit Sharma : हिटमॅन रोहित, रेकॉर्ड्समध्येही अव्वल; क्रिकेटमधील 5 खास कामगिरी..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube